टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार व त्याची पत्नी दिव्या खोसला वैयक्रीक कारणामुळे चर्चेत आले आहेत. तब्बल १९वर्ष संसार केल्यानंतर ही जोडी वेगळी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दिव्या खोसला हिने पती भूषण कुमारचे आडनाव काढून टाकल्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या वैवाहिक जीवनात अडथळे आले असून ती पती भूषण कुमारपासून वेगळी होऊ शकते, ही अफवाही पसरली होती. मात्र, दिव्याचे पती भूषण कुमार यांनी सर्व अफवा फेटाळून लावत दिव्याने ज्योतिषाच्या सांगण्यावरुन तिचे कुमार आडनाव काढून टाकले असून तिच्या आडनावात आणखी एक ‘एस’ जोडल्याचे सांगितले. (Bhushan Kumar and Divya Khossla)
भूषण कुमार त्याच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिव्याच्या प्रेमात पडला होता.अशातच दिव्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भूषण कुमारपासून घटस्फोटाच्या अफवांच्या दरम्यान, दिव्याने तिच्या दिवंगत आईसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आशयघन पोस्ट केली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिव्या तिच्या आईला किस करताना दिसत आहे. याचबरोबर दिव्याने लिहिले आहे की, “मी फक्त तुझ्याबद्दल विचार करत आहे. तुला खूप काही सांगायचे आहे”.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या पतीचे म्हणजेच भूषणचे आडनाव काढले आहे. लग्नाच्या सुरुवातीपासूनच दिव्या तिच्या पतीचे आडनाव अभिमानाने दाखवत आली आहे. आडनाव काढून टाकल्यानंतर दिव्याचा भूषण कुमारपासून घटस्फोट झाल्याची शंका अधिक तीव्र झाली आणि अनेकांना वाटले की कायमचे वेगळी होणार आहे. या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव होत आहे. “दिव्या खोसला आता दिव्या खोसला कुमार का नाही? भूषण कुमार आणि दिव्याचा घटस्फोट होणार आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
दिव्या खोसला कुमारचे लग्न भूषण कुमारशी झाले असून दोघांनी मिळून टी-सीरीज ही कंपनी मोठी केली आहे. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी दिव्याने लग्न केले. १३ फेब्रुवारी २००५ रोजी जम्मूच्या वैष्णो देवी मंदिरात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.