काही दिवसांपूर्वी किकेटर शोएब मलिक त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. शोएबने सना जावेदबरोबरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या या लग्नाची बातमी दिली होती. शोएबने सनाबरोबर लग्न करण्याआधी भारतीय टेनिसपटूबरोबर लग्न केले होते. सना व शोएब यांना एक मुलगादेखील आहे. शोएबच्या या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होताच सना जावेद व शोएब मलिक हे चांगलेच चर्चेत आले होते.
शोएबच्या या तिसऱ्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले होते. शोएबने भारतीय टेनिस सानियापासून विभक्त होणे चाहत्यांना आवडले नाही. अशातच सना नुकतीच शोएबला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. यावेळी सानिया मिर्झाच्या चाहत्यांनी सनाची थट्टा केली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pakistan fans teasing Shoaib Malik's 3rd wife 'Sana Javed' by calling her "Sania Mirza"#PSL9 pic.twitter.com/EXr0OQywvQ
— Don Cricket ???? (@doncricket_) February 20, 2024
आणखी वाचा – प्रसाद ओकला अमृता खानविलकरने गिफ्ट केलं महागड घड्याळ, अभिनेत्याने फोटोही केला पोस्ट, म्हणाला…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सना शोएबचा पीएसएल सामना पाहण्यासाठी व त्याला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला पाहून सानिया मिर्झाच्या काही चाहत्यांनी सनाकडे पाहून “सानिया… सानिया… सानिया मिर्झा… सानिया मिर्झा…” अशा घोषणा करत तिला चिडवले. मात्र, सनाने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सनाने चिडवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून तिथून काढता पाय घेतला.
दरम्यान, सानिया मिर्झा व शोएब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरल्या होत्या. शोएब व सानियाला पाच वर्षांचा मुलगाही आहे जो सानियाबरोबर राहतो. तर शोएबने लग्न केलेली २८ वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.