शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 20, 2024 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress Prarthana Behere is being trolled for mentioning Chhatrapati Shivaji Maharaj in a program see the details

लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी...”

१९ जानेवारी शिवजयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचनिमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिलादेखील एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. लातूरमधील एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. 

लातूरच्या उद्गीर मधील एका मॉलच्या उद्घाटनासाठी प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी उद्घाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार-पाच वेळा प्रार्थनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले आहेत. तसेच प्रार्थनाने आता माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

आणखी वाचा – “नणंदेसमोरच रवीने मला रस्त्यामध्ये मारायला सुरुवात केली अन्…”, ‘त्या’ असह्य वेदनांबाबत गश्मीर महाजनीच्या आईचा खुलासा, म्हणाल्या, “मारहाण…”

प्रार्थना बेहेरे शिवजयंती निमित्तानं उद्गीर येथे एका मॉलच्या उद्घाटनाला गेली होती. तिथे बोलताना ती असं म्हणाली की, “तुम्हा सर्वांना आज शिवाजी जयंती असल्यानं खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. उद्गीरकरांना एवढंच म्हणेन की, यानिमित्तानं मला उद्गीरमध्ये येता आलं. शिवाजी जयंतीच्या निमित्तानं मी इथे आले तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही शिवाजी जयंती कशी साजरी करता हे कळलं. इतकी छान रॅली चालली होती. सगळीकडे भगवा फडकत होता. हे सगळं पाहून खूप बरं वाटलं आणि अभिमान वाटला. मला इथे बोलावल्याबद्दल सगळ्यांचे आभार”.

आणखी वाचा – “अफेअर केलं तरी…”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर…”  

या व्हिडीओनंतर प्रार्थना बेहेरे चांगलीच ट्रोल झाली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच अनेक संतप्त शिवप्रेमींनी उद्गीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. दरम्यान, अभिनेत्रीबदल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. कुणी तिच्याबद्दल नकारात्मक कमेंट्स करत तिला ट्रोल केलं. तर काहींनी “तिने मुदाम काही केले नाही, तिच्याकडून चुकून झाले असावे, तिच्या मनात शिवाजी महाराजांविषयी आदर आहे, पण बोलण्याच्या ओघात तिच्याकडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला असावा” असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.

Tags: chhatrapati shivaji maharajchhatrapati shivaji maharaj jayantientertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsprarthana behereछत्रपती शिवाजी महाराज जयंतीप्रार्थना बेहेरेमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Esha Deol After Divorce

घटस्फोटानंतर लग्नाला पोहोचली ईशा देओल, कॅमेऱ्यासमोर येत प्रतिक्रियाही दिली अन्…; म्हणाली, "मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.