ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची लाडकी लेक ईशा देओल गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री ईशा तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. ईशा देओलने तब्बल ११ वर्षांनंतर पती भरत तख्तानीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्यानंतर ईशा देओल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत प्रतिक्रिया देताना दिसली. नुकतीच अभिनेत्री गोवा विमानतळावर स्पॉट झाली. (Esha Deol After Divorce)
सिनेसृष्टीत सध्या अभिनेता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. रकुल व जॅकी यांचं लग्न गोव्यात पार पडणार आहे. दरम्यान, सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी रकुल व जॅकीच्या लग्नाला हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. या जोडीच्या लग्नाला ईशा देओलसह बॉलिवूडच्या इतर दिग्गजांनी हजेरी लावली होती.
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान धर्मेंद्रची लेक पहिल्यांदाच पापाराझींसमोर आली. पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर ईशा देओलने पहिल्यांदा पापाराझींशी संवाद साधताना सांगितले की, ती पूर्णपणे बरी आहे. गोवा विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा ईशा पांढरा टी-शर्ट व जीन्स परिधान केलेली दिसली. तिने पांढऱ्या रंगाच्या मॅचिंग हॅटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
ईशा देओल व भरत तख्तानी लग्नाच्या ११ वर्षानंतर वेगळे होणार आहेत. या जोडप्याला दोन मुली आहेत. ईशा व भरत यांनी मिळून एक निवेदन जारी करुन हे सांगितले की, “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात आपल्या मुलांचा आनंद आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. आम्ही आशा करतो की तुम्ही सर्वजण आमच्या निर्णयाचा आदर कराल.” ईशा व भरत यांच्या घटस्फोटाला हेमा मालिनी यांचा पाठिंबा पाहायला मिळाला. तर धर्मेंद्र लेक व जावयाच्या या निर्णयावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं.