छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती. १७ डिसेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन घटना शेअर करत असते. नुकतीच सई लेकीसह तिच्या खास मैत्रिणींना भेटली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत व सई लोकुर या तिघी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि या घरातील त्यांची ही मैत्री अजूनही तशीच टिकून आहे.
अशातच सई तब्बल दीड वर्षांनी काल, १७ फेब्रुवारीला पहिल्यांदा आपल्या लेकीसह मेघा व शर्मिष्ठाला भेटली. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. सईने काल इन्स्टाग्रामवर ताशीबरोबर पहिल्यांदाच रोड ट्रीप करत असल्याचं चाहत्यांबरोबर शेअर केलं होतं. यावेळी तिने एक स्टोरी शेअर करत ती “पहिल्यांदाच आम्ही ताशीसह रोड ट्रीप करत आहोत. मी कुठे चालली आहे? हे मी लवकरच सांगेन. ताशी आज दोन महत्त्वाच्या लोकांना भेटणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही ओळखा ते दोन लोकं कोण आहेत?” असं म्हटलं होतं.
आणखी वाचा – “विलासरावांना जाऊन…”, स्टेजवर वाडिलांबाबत बोलताना ढसाढसा रडू लागला रितेश देशमुख, आईलाही अश्रु अनावर अन्…
यानंतर सईने मेघा व शर्मिष्ठाची भेट घेतल्याचादेखील एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यात सई असं म्हणते की, “जवळपास दीड वर्षांनी आम्ही आज भेटलो आहोत आणि या दीड वर्षात आमच्यातील प्रत्येकीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. शर्मिष्ठा एक निर्माती झाली आहे आणि मी आई झाली आहे. इतक्या वर्षांनी भेटून आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आमचा हा आनंद आम्ही साजरा करत आहोत. आमची ही धमाल, मस्ती आम्ही तुमच्याबरोबर शेअर करेन. तोपर्यंत असेच संपर्कात रहा”.
दरम्यान, सईने शर्मिष्ठा, मेघा व तिच्या धमाल, मज्जा-मस्तीचा एक खास व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे तूफान प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या तिघींच्या रियुनियनवरही कमेंट्सद्वारे आनंद व्यक्त केला आहे.