सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ही दोस्ती तुटायची नाय!’, तब्बल दीड वर्षांनी सईने घेतली जिवलग मैत्रिणींची भेट, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 18, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sai Lokur met Megha Dhade Sharmistha Raut after one and a half years also she shared this special video on social media

‘ही दोस्ती तुटायची नाय!’, तब्बल दीड वर्षांनी सईने घेतली जिवलग मैत्रिणींची भेट, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती. १७ डिसेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन घटना शेअर करत असते. नुकतीच सई लेकीसह तिच्या खास मैत्रिणींना भेटली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत व सई लोकुर या तिघी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि या घरातील त्यांची ही मैत्री अजूनही तशीच टिकून आहे.

अशातच सई तब्बल दीड वर्षांनी काल, १७ फेब्रुवारीला पहिल्यांदा आपल्या लेकीसह मेघा व शर्मिष्ठाला भेटली. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. सईने काल इन्स्टाग्रामवर ताशीबरोबर पहिल्यांदाच रोड ट्रीप करत असल्याचं चाहत्यांबरोबर शेअर केलं होतं. यावेळी तिने एक स्टोरी शेअर करत ती “पहिल्यांदाच आम्ही ताशीसह रोड ट्रीप करत आहोत. मी कुठे चालली आहे? हे मी लवकरच सांगेन. ताशी आज दोन महत्त्वाच्या लोकांना भेटणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही ओळखा ते दोन लोकं कोण आहेत?” असं म्हटलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

आणखी वाचा – “विलासरावांना जाऊन…”, स्टेजवर वाडिलांबाबत बोलताना ढसाढसा रडू लागला रितेश देशमुख, आईलाही अश्रु अनावर अन्…

यानंतर सईने मेघा व शर्मिष्ठाची भेट घेतल्याचादेखील एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यात सई असं म्हणते की, “जवळपास दीड वर्षांनी आम्ही आज भेटलो आहोत आणि या दीड वर्षात आमच्यातील प्रत्येकीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. शर्मिष्ठा एक निर्माती झाली आहे आणि मी आई झाली आहे. इतक्या वर्षांनी भेटून आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आमचा हा आनंद आम्ही साजरा करत आहोत. आमची ही धमाल, मस्ती आम्ही तुमच्याबरोबर शेअर करेन. तोपर्यंत असेच संपर्कात रहा”.

आणखी वाचा – ‘आजी सोनियाचा दिनु’ संदीप पाठक आजीला भेटायला पोहोचला उद्गीरमध्ये, सोशल मीडियावर भेटीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, सईने शर्मिष्ठा, मेघा व तिच्या धमाल, मज्जा-मस्तीचा एक खास व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे तूफान प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या तिघींच्या रियुनियनवरही कमेंट्सद्वारे आनंद व्यक्त केला आहे.   

Tags: सई लोकुरशर्मिष्ठा राऊतमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीमेघा धाडेentertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmegha dhadesai lokurSharmistha Raut
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Bollywood actress rashmika mandanna escaped death today due to emergency landing of flight see the details

“काळ आला होता पण...”, रश्मिका मंदानाने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे खळबळ, म्हणाली, “मरता मरता...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.