सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. सोशल मीडियाद्वारे हेमांगी विविध विषयांवर भाष्य करत असते. समाजातील विविध मुद्दयावर हेमांगी तिचे मत अगदी स्पष्टपणे व्यक्त करते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला आहे. तरीदेखील अभिनेत्री या ट्रोलिंगला न जुमानता व्यक्त होत असते.
अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे काही स्टायलिश फोटो तसेच विनोदी रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसेच ती काही सामाजिक विषयांवरही भाष्य करत असते. अशातच तिने तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ तलावातील पाण्याची रिकामी बॉटल त्याच्या तोंडात पकडतो आणि ती बॉटल तोंडात धरून जात आहे. हेमांगीने हा व्हिडीओ शेअर करत “हे चुकीचे आहे. जंगलाचा राजा हे करताना पाहावत नाही. हे पाहून लाज वाटत आहे. आपण नालायक आहोत” असं म्हटलं आहे. तसेच यावर तिने दु:खही व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गेले काही दिवस वाघाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी पर्यटक व माणसाच्या चुकीच्या वर्तणूकीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावर हेमांगीनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.