गेल्या काही दिवसांत मनोरंजन सृष्टीत अनेक घडामोडी घडत असतानाचे पाहायला मिळत आहेत. कुणी आपल्या जोडीदाराबरोबर त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे, तर कुणी त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांचा विवाहिक आयुष्याचा प्रवास संपवत आहेत. अशातच मनोरंजन सृष्टीतून एक बाटमई समोर येत आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौरने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून तिच्या सासरकडचे पटेल हे आडनाव काढल्याने तसेच सोशल मीडियावरील नवरा निखिल पटेलबरोबरचे काही फोटो काढल्यामुळे ती चर्चेत आली आहे. दलजीत व तिचा दुसरा पती निखिल पटेल यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असावा, असे बोलले जात आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, आता या संपूर्ण प्रकरणाबाबत दलजीतच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, “दलजीत व जेडन (तिचा मुलगा) सध्या दलजीतच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात आहेत. यानंतर दलजीतच्या आईवरही शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी तिला त्यांच्याबरोबर असणे आवश्यक आहे. ती सध्या कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू इच्छित नाही. त्यामुळे कृपया तिचा व तिच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर करा.”
त्याचबरोबर दलजीतने ई-टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की, “आईवडिलांच्या वैद्यकीय शस्त्रक्रियेव्यतिरिक्त ती तिच्या बॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आली आहे. “माझा पहिला चित्रपट दशमी रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मी भारतात आले आहे, पण भारतात येण्याचे माझे खरे कारण माझ्या वडिलांच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाही आहे. त्यामुळे मी आधी इथे येऊन प्रीमियरला उपस्थित राहण्याचे ठरवले आणि नंतर बंगलोरला परत जाऊन माझ्या वडिलांची काळजी घेणार आहे.”
आणखी वाचा – घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला शोएब मालिक देणार इतके कोटी?, पहिल्या पत्नीला दिली होती इतकी रक्कम
दरम्यान, दलजीत कौर व निखिल पटेल यांच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. तिच्या दुस-या लग्नानंतर दलजीत केनियाला गेली. पण ती आता भारतात परतल्यानंतर तिच्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी दलजीतचा अभिनेता शालीन भानौतबरोबर घटस्फोट झाला आहे.