शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला वर्ष होण्याआधीच दलजीत कौरच्या दूसरा संसार मोडणार? सोशल मीडियावरील नवऱ्याबरोबरचे फोटो डिलीट केल्यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना उधाण

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 10, 2024 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tv actress dalljiet kaur marriage separation rumours with second husband nikhil patel team react

लग्नाला वर्ष होण्याआधीच दलजीत कौरच्या दूसरा संसार मोडणार? सोशल मीडियावरील नवऱ्याबरोबरचे फोटो डिलीट केल्यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांत मनोरंजन सृष्टीत अनेक घडामोडी घडत असतानाचे पाहायला मिळत आहेत. कुणी आपल्या जोडीदाराबरोबर त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे, तर कुणी त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांचा विवाहिक आयुष्याचा प्रवास संपवत आहेत. अशातच मनोरंजन सृष्टीतून एक बाटमई समोर येत आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौरने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून तिच्या सासरकडचे पटेल हे आडनाव काढल्याने तसेच सोशल मीडियावरील नवरा निखिल पटेलबरोबरचे काही फोटो काढल्यामुळे ती चर्चेत आली आहे. दलजीत व तिचा दुसरा पती निखिल पटेल यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असावा, असे बोलले जात आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, आता या संपूर्ण प्रकरणाबाबत दलजीतच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, “दलजीत व जेडन (तिचा मुलगा) सध्या दलजीतच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात आहेत. यानंतर दलजीतच्या आईवरही शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी तिला त्यांच्याबरोबर असणे आवश्यक आहे. ती सध्या कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू इच्छित नाही. त्यामुळे कृपया तिचा व तिच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर करा.”

आणखी वाचा – “भारतीय शास्त्रीय संगीतात…”, पदवी अन् गोल्ड मेडल मिळवल्यानंतर मुग्धा वैशंपायनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्या सासरच्या मंडळींचे…”

त्याचबरोबर दलजीतने ई-टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की, “आईवडिलांच्या वैद्यकीय शस्त्रक्रियेव्यतिरिक्त ती तिच्या बॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आली आहे. “माझा पहिला चित्रपट दशमी रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मी भारतात आले आहे, पण भारतात येण्याचे माझे खरे कारण माझ्या वडिलांच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाही आहे. त्यामुळे मी आधी इथे येऊन प्रीमियरला उपस्थित राहण्याचे ठरवले आणि नंतर बंगलोरला परत जाऊन माझ्या वडिलांची काळजी घेणार आहे.”

आणखी वाचा – घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला शोएब मालिक देणार इतके कोटी?, पहिल्या पत्नीला दिली होती इतकी रक्कम 

दरम्यान, दलजीत कौर व निखिल पटेल यांच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. तिच्या दुस-या लग्नानंतर दलजीत केनियाला गेली. पण ती आता भारतात परतल्यानंतर तिच्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी दलजीतचा अभिनेता शालीन भानौतबरोबर घटस्फोट झाला आहे. 

Tags: bollywood actressBollywood entertainment newsbollywood newsdalljiet kaurDivorce rumoursDivorce rumours Newsentertainment newsघटस्फोट चर्चाघटस्फोट चर्चा बातमीदलजीत कौरबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Arbaaz Khan Break Silence

"ती १६ वर्षांची नाही पण…", बायकोच्या वयासंबंधित चर्चा करणाऱ्यांना अरबाज खानचं सडेतोड उत्तर, म्हणाला, "तिला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.