शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी गर्भपात, मुल नको होतं अन्…; ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा गरोदर, म्हणाली, “तीन महिन्यांमध्येच…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2024 | 4:29 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg boss season 9 contestant priya malik pregnant expecting first baby in april and actress talk about her miscarriage

आधी गर्भपात, मुल नको होतं अन्...; ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा गरोदर, म्हणाली, “तीन महिन्यांमध्येच...”

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या शोला प्रेक्षकांकडून कायमच चांगला प्रतिसाद मिळत असतो. या शोच्या प्रत्येक पर्वाला व शोमधील स्पर्धकांना प्रेक्षकांकडून किंवा चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळत असते. अशातच ‘बिग बॉस’च्या ९व्या पर्वातील स्पर्धक प्रिया मलिकने तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. प्रियाने नुकतीच तिच्या प्रेग्नंसीबद्दल घोषणा केली आहे. अभिनेत्री पहिल्यांदाच आई होणार आहे.

‘ई-टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने तिच्या पहिल्या प्रेग्नंसीबद्दल व पहिल्या गर्भपाताबद्दलही भाष्य केलं आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला ती गरोदर राहिली. पण पहिल्या तीन महिन्यांतच तिचा गर्भपात झाला आणि तिला तिचे मूल गमावले याबद्दलही तिने या मुलाखतीत सांगितले. तसेच येत्या एप्रिल महिन्यात प्रिया तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचेही तिने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Priya Malik ???? प्रिया मलिक (@priyasometimes)

आणखी वाचा – ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्ताने करण जोहरची ओटीटी प्रेक्षकांसाठी खास भेट, वेबसीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांच्या प्रेमकथा अन्…

या मुलाखतीत प्रियाने असं म्हटलं की, “इतक्या लवकर मला मूल नको होतं. मला नेहमीच आई व्हायचं होतं. पण मी पहिल्यांदा गरोदर होते. तेव्हा तीन महिन्यांतच माझा गर्भपात झाला आणि यात मी माझ्या मूल गमावले.” यापुढे ती असं म्हणाली की, “लोक गर्भधारणेबद्दल बोलतात परंतु गर्भपाताबद्दल कुणीच बोलत नाहीत. जेव्हा मी पुन्हा गरोदर राहिले. तेव्हा प्रत्येक अल्ट्रासाऊंड चाचणी माझ्यासाठी एक परीक्षा होती आणि या परीक्षेत मी कायम नापास होईल की काय? अशी भीती मला वाटत होती.”

आणखी वाचा – ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा, ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही पसंती

दरम्यान, प्रिया मलिक व उद्योगपती करण बक्षी यांचे २०२२ मध्ये लग्न झाले होते. अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २००८ मध्ये तिचे भूषण मलिकबरोबर लग्न झाले होते, परंतु २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर तिने करणबरोबर तिचा दूसरा संसार थाटला.

Tags: Bigg Boss Season 9 Contestantbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsPriya Malikप्रिया मलिकबिग बॉस सीझन ९ स्पर्धकबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actor Riteish Deshmukh impressed with Genelia's Marathi speaking at Maharashtracha Favorite Kon 2023 award ceremony

Video : भर कार्यक्रमात बायकोने ‘अहो’ म्हणताच रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या, देशमुखांच्या सूनेचं मराठी ऐकून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.