बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भर कार्यक्रमात बायकोने ‘अहो’ म्हणताच रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या, देशमुखांच्या सूनेचं मराठी ऐकून कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2024 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Riteish Deshmukh impressed with Genelia's Marathi speaking at Maharashtracha Favorite Kon 2023 award ceremony

Video : भर कार्यक्रमात बायकोने ‘अहो’ म्हणताच रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या, देशमुखांच्या सूनेचं मराठी ऐकून कौतुकाचा वर्षाव

मराठी मनोरंजन विश्वातील ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा एक महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सोहळ्याला अनेक नामांकित कलाकार आपली हजेरी लावून या सोहळ्याची शान वाढवतात.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यालादेखील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यापैकी एका प्रोमोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. यात जिनिलीया पुरस्कार स्वीकारताना रितेशला प्रेमाने “अहो! हा पुरस्कार तुमच्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी आहे” असं म्हणते. यावर रितेश भर सोहळ्यात सर्व उपस्थितांसमोर शिट्ट्या वाजवत तिचं कौतुक करतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटाने तब्बल नऊ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यासंबंधित हातात पुरस्कार घेतलेला एक फोटोही रितेश-जिनिलीया यांनी शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स, कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव केला होता.

आणखी वाचा – ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्ताने करण जोहरची ओटीटी प्रेक्षकांसाठी खास भेट, वेबसीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांच्या प्रेमकथा अन्…

अशातच रितेश-जिनिलीया यांच्या या नवीन प्रोमोवरदेखील चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच त्यांच्या अनेक चाहत्यांनी रितेशच्या काळ्या सूटचे व जिनिलीयाची लाल रंगाची नेटची साडी हा खास लूक आवडला असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमधील जिनिलीयाच्या मराठी बोलण्याचे व गोड स्वभावाचेही अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे.

आणखी वाचा – आधी गर्भपात, मुल नको होतं अन्…; ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा गरोदर, म्हणाली, “तीन महिन्यांमध्येच…”

दरम्यान, यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३‘ या पुरस्कार सोहळ्यात बाईपण भारी देवा’, ‘वेड’, ‘झिम्मा २’, ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’, ‘नाळ २’, व ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटांमध्ये पुरस्कारासाठी चांगलीच स्पर्धा मिळाली. पण ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या पुरस्कारासाठी ‘वेड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवल्याचे पाहायला मिळाले.

Tags: entertainment newsgenelia deshmukhMaharashtracha Favorite Kon 2023Maharashtracha Favorite Kon 2023 awardmarathi actormarathi actressMarathi artistmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsriteish deshmukhजिनिलीया देशमुखमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी कलाकारमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमहाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३रितेश देशमुख
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Fighter movie controversy indian air force wing commander send legal notice on hrithik roshan deepika padukone kissing scene in uniform see the details

हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या किसिंग सीनमुळे वायुसेना दल नाराज, ‘फायटर’ वादात, अधिकृत नोटीसही पाठवली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.