आज ३१ जानेवारी, मराठी मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार मंडळींचा आज वाढदिवस आहे. त्यानिमिताने या कलाकारांना सोशल मीडियाद्वारे चाहते मंडळीसह त्यांच्या जवळच्या अनेक खास व्यक्तींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचादेखील वाढदिवस आहे. आणि तिलादेखील सोशल मीडियावर तिच्या चहात्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच तिच्या आयुष्यात नुकत्याच आलेल्या एका खास व्यक्तीकडूनही तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आल्या आहेत.
गौतमीच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती म्हणजे तिचा नवरा स्वानंद तेंडुलकर. अभिनेत्रीने नुकतीच स्वानंदसह विवाहगांठ बांधली आणि तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे आणि आज स्वानंदीच्या वाढदिवसानिमित्त स्वानंदने तिच्याबरोबरचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा खास फोटो शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या आयुष्यातील या सुंदर स्त्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी भाग्यवान आहे”. त्याचबरोबर त्याने या फोटोमध्ये गौतमी देशपांडेला टॅग करत “शुभेच्छा व अनेक आशीर्वाद” असंही म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षात स्वानंद व गौतमी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाले असल्याचे पाहायला मिळाले. स्वानंद-गौतमी ही दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियाव्रत रंगल्या होत्या. मात्र या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलल कधीही सांगितले नव्हते. अशातच गौतमीची बहीण मृण्मयी हिने दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करताच त्यांच्या नात्याविषयी सर्वांना माहीत झाले.
त्यानंतर दोघांच्या संगीत समारंभाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर होताच स्वानंद-गौतमीच्या नात्याबद्दल अधिकृतपणे सर्वांनाच माहीत झाले. त्यांच्या लग्नयातील फोटो व व्हीडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर या खास फोटोवरदेखील चाहते लाईक्स व कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.