शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारुकी आहे तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा मालक, महिन्याला कमावतो इतके रुपये? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2024 | 10:11 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Winner Munawar faruqui net worth income and Remuneration fee see the details

Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारुकी आहे तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा मालक, महिन्याला कमावतो इतके रुपये? जाणून घ्या...

अभिनेता व कॉमेडीयन मुनव्वर फारुकी याने ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वाचे विजेतेपद पटकावत त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. मुनव्वर या शोमध्ये येण्यापूर्वीच त्याचा चाहतावर्ग हा मोठा होताच. या शोमध्ये येण्यापूर्वीदेखील त्याने असाच एक रियालिटी शो जिंकला होता. त्यामुळे हा शोदेखील तोच जिंकणार असा विश्वास त्याच्या चाहत्यांना होता आणि या शोचे विजेतेपद पटकावत मुनव्वरने तो विश्वास खरा ठरवला.

या शोचे विजेतेपद पटकावल्यामुळे त्याला बिग बॉसची आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम ५० लाख रुपये व एक आलीशान कार बक्षीस म्हणून मिळाली. तसेच नुकतेच त्याचे तो राहत असलेल्या ठिकाणी म्हणजेच डोंगरी येथे मोठ्या धुमधडाक्यात स्वागतही करण्यात आले. अशातच त्याच्या संपत्तीबद्दल एक माहिती समोर येत आहे. टाईम्स नाऊ व झी न्यूजच्या एका वृत्तानुसार, मुनव्वर फारुकीची एकूण संपत्ती ८ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा – ‘सिकंदर’ ते ‘सैंधव’, या आठवड्यात ओटीटीवर पाहता येणार ॲक्शन अन् डॉक्यूड्रामा असलेले चित्रपट व सीरिज, पाहा संपूर्ण यादी

मुनव्वरला स्टँड-अप कॉमेडी शो, म्युझिक अल्बम, रिॲलिटी शो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून प्रचंड कमाई होते. याआधी त्याने ‘लॉक अप’ आणि आता ‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यामुळे ‘टाईम्स नाऊ’च्या मते, तो त्याच्या प्रत्येक स्टँड-अप कॉमेडी शोमधून जवळपास दीड ते अडीच लाख रुपये कमावतो. मुनव्वरची लोकप्रियतय अधिक असल्यामुळे त्याचा चाहतावर्गदेखील तितकाच मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे फॉलोवर्सही अधिक आहेत. मुनव्वरचे इन्टाग्रामवर १२ मिलियनच्या जवळपास फॉलोअर्स आहेत आणि इन्टाग्रामवरील प्रायोजित पोस्टसाठी तो सुमारे १५ लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा – “लेकासाठी ट्रॉफी जिंकली आणि…”, ‘बिग बॉस १७’चं विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वरची प्रतिक्रिया, मुलासह जंगी सेलिब्रेशन केलं अन्…

तसेच टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्ता नुसार, बिग बॉस १७’साठी मुनव्वर दर आठवड्याला ७ ते ८ लाख रुपये घेत असल्याची माहिती आहे. त्या हिशोबाने मुनव्वर बिग बॉसच्या घरात तब्बल १२ आठवडे राहिल्याने या शोसाठी त्याला ८५ लाख ते ९५ लाख रुपये मिळाले असल्याचा अंदाज आहे. तसेच ५० लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह, त्याला १.३५ ते १.४५ कोटी रुपयेदेखील मिळाले असल्याचे वृत्त आहे.

Tags: मनोरंजन बातमीमुनव्वर फारुकीबिग बॉस बातमीबिग बॉस विजेताबिग बॉस १७बिग बॉस १७ विजेताबॉलीवूड बातमीbigg boss 17bigg boss 17 newsbigg boss 17 winnerbigg boss newsbigg boss winnerbollywood newsentertainment newsMunawwar Farooqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Raj Thackeray On Ashok Saraf

अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून अभिनंदन, राज्यसरकारचेही मानले आभार, म्हणाले, "कलाकारांचा तुटवडा नाही पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.