शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आयुष्यातील…”, अंकुशच्या वाढदिवसानिमित्त बायकोची खास पोस्ट, रोमॅंटिक फोटो शेअर केला अन्…; म्हणाली, “आजच्या दिवशी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2024 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Deepa Chaudhary shared a special photo and wished Ankush on his marriage and birthday

“माझ्या आयुष्यातील...”, अंकुशच्या वाढदिवसानिमित्त बायकोची खास पोस्ट, रोमॅंटिक फोटो शेअर केला अन्...; म्हणाली, “आजच्या दिवशी...”

मराठी मनोरंजन सृष्टीतला ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. मराठी मनोरंजन सृष्टमधील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अंकुश हा अग्रक्रमी आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या सुपरस्टारचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांसह त्याच्या लाखों चाहत्यांकडूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंकुशला त्याचे तमाम चाहते आज सकाळपासून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अशातच अंकुशची बायको व अभिनेत्री दीपा चौधरी हिनेही लाडक्या नवऱ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपाने अंकुशसाठी खास रोमँटीक पोस्ट लिहून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Deepa Chaudhary On Instagram)

दीपाने सोशल मीडियावर अंकुशबरोबरचा एक खास फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोखाली तिने कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, “हा दिवस माझ्या आयुष्यातील खूपच खास दिवस आहे. कारण या दिवसामुळे माझ्या आयुष्यात दोन सर्वात खास घटना घडल्या आहेत. आज तुझा वाढदिवसही आहे आणि आजच्याच दिवशी आपण लग्नदेखील केले.” यापुढे तिने “वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अहो” आणि “लग्नाच्या वाढदिवसानिमित्तही शुभेच्छा” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

आणखी वाचा – “लेकासाठी ट्रॉफी जिंकली आणि…”, ‘बिग बॉस १७’चं विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वरची प्रतिक्रिया, मुलासह जंगी सेलिब्रेशन केलं अन्…

अंकुशची पत्नी दीपा हीदेखील एक उत्तम अभिनेत्री आहे. गेल्या वर्षात दीपाचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातून दीपाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर अंकुशचाही ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येऊन गेला. यात अंकुशने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली होती.   

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नव्या सलोनचा उद्घाटन सोहळा, पुण्यात सुरु केला नवा व्यवसाय, राज ठाकरेंची खास उपस्थिती

अंकुशचा वाढदिवस व अंकुश-दीपा यांच्या लग्नाचा वाढदिवस हा एकाच दिवशी असल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या दोघांना कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. दीपाने शेअर केलेल्या या फोटोलाही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अंकुशच्या अनेक चाहते मंडळींनी त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच अंकुश व दीपा यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: ankush chaudharydeepa chaudharyentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsअंकुश चौधरीदीपा चौधरीमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Amruta Deshmukh Birthday

लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवसाला प्रसाद जवादेने दिलं सरप्राइज, जंगी सेलिब्रेशन केलं अन् केकही कापला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.