शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम ‘या’ कलाकाराची नवीन मालिकेत वर्णी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2024 | 11:46 am
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
sukh mhanje nakki kay asta fame malhar aka actor kapil honrao will play new role in new serial nivedita mazi tai

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम ‘या’ कलाकाराची नवीन मालिकेत वर्णी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

स्टार प्रवाह वहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. गेल्या दोनेक वर्षांपासून ही मालिका  प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. तसेच अनेकदा या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्डसही मोडले आहेत. मालिकेची कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय तसेच मालिकेतील अनेक नवनवीन ट्विस्ट यांमुळे मालिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली. या मालिकेतील जयदीप-गौरी या दोन मुख्य कलाकारांसह सहकलाकारांवरदेखील चाहत्यांनी भरभरून प्रेम केले.

नुकताच या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे मालिकेने २५ वर्षांची लिप घेतली. त्यामुळे या मालिकेतील काही जुन्या पात्रांची मालिकेतून एक्झिट झाली. यांमध्ये मालिकेत मल्हार या पात्राचीसुद्धा एक्झिट झाली. अभिनेता कपिल होनरावने मल्हार हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. त्याची सहाय्यकाची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली होती. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो कोणत्या नवीन भूमिकेत झळकणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Kaapil Honrao (@kapilhonrao)

हेही वाचा – उदय टीकेकर यांचा पत्नीबरोबर रोमॅंटिक फोटो, किसही केलं , म्हणाले, “बायको…”

अशातच मल्हार फेम अभिनेता कपिल होनरावने त्याच्या चाहत्यांना एक सुखद बातमी दिली आहे. कपिल हा लवकरच एका नवीन भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सोनी मराठी वाहिनीवर अलीकडेच सुरू झालेल्या एका नव्या मालिकेत तो झळकणार आहे. याचाच एक प्रोमो शेअर करत त्याने त्याच्या नवीन भूमिकेविषयी सर्वांना माहिती दिली आहे. अभिनेता कपिल होनराव ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत दिसणार आहे. ही नवी मालिका १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. याच नव्या मालिकेतून कपिल नव्या भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, ‘निवेदिता माझी ताई’ या नव्या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई, अभिनेत्री एतशा संझगिरी आणि बालकलाकार रुद्रांश चोंडेकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर अशोक ‘यशोधन’, एतशा ‘निवेदिता’ आणि रुद्रांश ‘असीम’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Tags: entertainment newskapil honraomarathi actormarathi entertainmentMarathi newsmarathi serialsukh mhanje nakki kay astaकपिल होनरावमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिकासुख म्हणजे नक्की काय असतं
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss 17 contestants list and more in marathi

Bigg Boss 17 : घर, रुम अन्…; इतकी सुंदर आहे 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी, विजेत्या स्पर्धकाला मिळणार एवढी रक्कम अन्…; कोण ठरणार मानकरी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.