‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचे यंदाचे १७वे संपायला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. बिग बॉसचे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. त्याचबरोबर या शोमध्ये गाजलेल्या जोड्यादेखील चांगल्याच गाजल्या. बिग बॉसच्या घरात आलेल्या जोड्यांपैकी अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चांगलीच गाजली. अंकिता-विकी यांच्यातील घटस्फोट व सततच्या भांडणांमुळे ही जोडी विशेष गाजली. ‘बिग बॉस’च्या घरात विकी अंकिताच्या बाजूने खेळेल असं मत सुरुवातीला व्यक्त केले जात होते. मात्र विकीने घरात स्वत:चा वेगळा खेळ खेळत साऱ्यांनाच अवाक केले.
‘बिग बॉस’च्या घरात विकी आतापर्यंत चांगल खेळ खेळत होता. मात्र महाअंतिम सोहळ्यात जायच्या आधीच त्याचा या घरातील खेळ संपला. त्यामुळे विकीचा नुकताच या घरातील प्रवास संपला आणि त्याला या घरातून बाहेर जावे लागले आहे. बिग बॉसमुळे विकीला प्रसिद्धी तर मिळाली पण त्याचबरोबर खूप पैसाही मिळाला आहे.
Siasat.com च्या एका रिपोर्टमध्ये, विक्की जैन एका भागासाठी तब्बल ७१,००० रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार तो दर आठवड्याला सुमारे ५ लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जात आहे. विकी हा ‘बिग बॉस’च्या घरात गेल्या आठवड्यापर्यंत होता. त्यामुळे विकी जैन प्रत्येक भागासाठी घेत असलेल्या मानधनानुसार आतापर्यंत ७० लाख रुपये कमावले आहेत.
आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध गायकाचा परदेशात भीषण अपघात, भररस्त्यात कार उलटली अन्…; भयानक व्हिडीओ व्हायरल
‘बिग बॉस’च्या शोमध्ये येण्यापूर्वी विकी जैनची तशी फार वैयक्तिक ओळख नव्हती. विकी या घरात अंकिता लोखंडेच्या प्रसिद्धी व लोकप्रियतेमुळे आला. पण या घरात त्याने त्याची वैयक्तिक् ओळख व प्रसिद्धी मिळवली आहे. असं म्हणायला हतक्त नाही.