Fighter First Review : हृतिक रोशन व दीपिका पदुकोणच्या ऍक्शन चित्रपट ‘फायटर’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आज हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी सिनेमागृहांमध्ये बरीच आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. या सगळ्यात ‘फायटर’चा पहिला रिव्ह्यूही समोर आला आहे.
‘फायटर’ हा चित्रपट नेमका कसा आहे याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला असून प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. चित्रपट पाहता हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व सिद्धार्थ आनंद यांची खूप प्रशंसा करण्यात आली आहे. आज २५ जानेवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे, फायटर हा वर्षातील पहिला बिग बजेट चित्रपट असून तो चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. ‘फायटर’चा पहिला रिव्ह्यू ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.
#OneWordReview…#Fighter: BRILLIANT.
— taran adarsh (@taran_adarsh) January 24, 2024
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️½#War. #Pathaan. Now #Fighter. Director #SiddharthAnand scores a hat-trick… Aerial combat, drama, emotions and patriotism, #Fighter is a KING-SIZED ENTERTAINER, with #HrithikRoshan’s bravura act as the topping… JUST DON’T… pic.twitter.com/t9fmssfw2P
तरणने आपल्या रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाला साडेचार स्टार दिले आहेत. फायटर हा एक ‘विलक्षण’ चित्रपट असल्याचे वर्णन त्याने या रिव्ह्यूमध्ये केले आहे. तसेच हृतिक, दीपिका व अनिल कपूर यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. फायटर रिव्ह्यूबाबत तरणने लिहिले आहे की, “फायटर हा युक्तीने बनवलेला चित्रपट आहे. हा चित्रपट जसजसा उलगडत जातो तसतसा एक ठोस विधान करतो. काही निवडक दृश्य सोडले तर, हवाई पुनरागमनाचा भाग वा टाळ्या वाजवण्यायोग्य संवाद पाहता ही कलाकृती अप्रतिम आहे. फायटर जे वचन देतो ते पूर्ण करतो. त्यामुळे या चित्रपटाचा स्क्रीन अनुभवही मस्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फायटर ही त्या शूर पुरुषांना खरी श्रद्धांजली आहे ज्यांनी निःस्वार्थपणे आपल्या देशाचे प्रभावीपणे संरक्षण केले आहे.
कामगिरीबद्दल बोलताना तरणने लिहिले की, “कोणतीही शंका न घेता, हृतिक रोशन प्रत्येकाला खुर्चीत खिळवून ठेवतो. तो अविश्वसनीय प्रामाणिकपणाने शौर्य, संयम व राग व्यक्त करताना दिसला आहे. चित्रपटातील प्रत्येक क्षण त्याने उत्कृष्ट अभिनयाने जिवंत केले आहेत. दीपिका पदुकोणने चित्रपटात आवश्यक भूमिका अतिशय उत्तमपणे निभावली आहे. चित्रपटातील सहाय्यक कलाकारांचे कौतुक करत त्याने पुढे लिहिले आहे की, “अनिल कपूर यांनी नेहमीप्रमाणे चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत”.