पंजाबी संगीत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिलचा कार अपघात झाल्याची बातमी आहे. ब्रिटिश कोलंबिया भागात सिप्पीची गाडी उलटली. या घटनेचा व्हिडीओ स्वतः सिप्पीने त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. अपघाताचा व्हिडीओ शेअर करत त्याने या त्याच्या अपघाताबद्दलही माहिती दिली आहे.
सिप्पीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची गाडी उलटली असल्याचे पाहायला मिळत असून या गाडीटुन्न तो बाहेर पडतानाचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याला एक माणूस मदत करत असल्याचेदेखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सिप्पीने हा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले की, “आम्ही सर्व मित्र कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया इथं निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझ्या मित्रांनी माझ्यासोबत रूमवर थांबण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान मी एकटाच ऑफ-रोडिंगसाठी निघालो. रुबिकॉन कारने जात असताना कार माझी कार उलटली.
आणखी वाचा – ताज्या भाजीसाठी थेट शेतामध्ये गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, स्वतः केलं काम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र कारचं मोठं नुकसान झालं आहे. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने मला मदत केली. या अपघाताबाबत मदत करणारा म्हणाला की, या रस्त्यावर अशा घटना सतत घडत असतात. सकारात्मक माणसाबरोबर नेहमी सकारात्मक घडते.” तसेच यापुढे त्याने मदत करणाऱ्या माणसालादेखील धन्यवाद म्हटले आहे.
आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप!, प्रथमेश-क्षितिजा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात, अनोख्या लग्न पत्रिकेने वेधलं लक्ष
सिप्पी गिल हे त्यांच्या पंजाबी गाण्यांसाठी ओळखले जातात. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्याचे ‘सोलमेट’ हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याशिवाय २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘बेकदरा’ या गाण्याला आतापर्यंत १८० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हे सिप्पीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट गाणे आहे जे प्रेक्षकांमध्ये खूप ऐकले गेले आहे.