‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा प्रवास आता अंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाला असून महाअंतिम सोहळ्यासाठी आता उलटी गिनती सुरु झाली आहे. येत्या २८ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये आता धाकधुक निर्माण झाली आहे. बिग बॉस १७च्या टॉप ६ स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा व अरुण महाशेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. अशातच अंतिम सोहळ्याच्या शेवटच्या क्षणाला या घरातील आणखी एकाचा प्रवास संपणार आहे.
सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यात प्रत्येक स्पर्धकाला एका चिठ्ठीद्वारे तो स्पर्धक सुरक्षित आहे की नाही याबद्दल माहिती मिळते. प्रत्येक स्पर्धक एक चिठ्ठी उघडताना प्रोमोमध्ये दिसत आहे. आता बाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव प्रोमोमध्ये समोर आलेले नाही. मात्र सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांवरुन विकी जैनचा या घरातील प्रवास संपणार असल्याचे म्हटले जात आहे, विकी जैनला सर्वात कमी मते मिळाल्यामुळे या शोमधील आता त्याचा प्रवास संपणार आहे.
Breaking #VickyJain has been ELIMINATED from the house
— The Khabri (@TheKhabriTweets) January 22, 2024
मात्र सोशल मीडियावर विकीच्या घराबाहेर पडण्याच्या निकालावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अरुण महाशेट्टीच्या अंतिम सोहळ्यात पोहोचण्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महाअंतिम सोहळ्यासाठी अरुणपेक्षा विकी जास्त पात्र असल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.
आणखी वाचा – सैफ अली खान रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय? अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला…
दरम्यान, नुकतेच या घरातून आयेशा खान व ईशा मालवीया यांचा या घरातील प्रवास संपला आहे. अशातच आता महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना विकी जैनचे घराबाहेर पडणे हे अनेकांच्या पचणी पडत नाही आहे. त्यामुळे अनेकजण ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांवर नाराज असून ते हे मुद्दाम करत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.