रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुंदर रांगोळी, पारंपरिक सजावट अन्…; प्रवीण तरडेंनी केली श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, पत्नीने व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “कलियुगातील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2024 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pravin Tarde Wife Post

सुंदर रांगोळी, पारंपरिक सजावट अन्…; प्रवीण तरडेंनी केली श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, पत्नीने व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, "कलियुगातील…"

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा (२२ जानेवारी) रोजी पार पडला. या खास दिवसाचं सर्व भारतीयांनी जल्लोषात स्वागत केलं आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी अनेक सिनेकलाकारांनी व दिग्गज मंडळींनी उपस्थिती दर्शवत या सोहळ्याला चारचाँद लावले. दरम्यान अनेक कलाकार मंडळींनी घरच्या घरीच श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं घरच्या घरी आयोजन केलं होतं. अशातच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील त्यांच्या राहत्या घरी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली. याचा सुंदर व्हिडीओ त्यांच्या पत्नी स्नेहल यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Pravin Tarde Wife Post)

स्नेहल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती असलेली सुंदर रांगोळी पाहायला मिळत आहे. शिवाय श्रीराम प्रभुच्या आगमनासाठी पारंपरिक सजावट केलेली पाहायला मिळाली. त्यांचा हा भक्तीत तल्लीन झालेला व्हिडीओ त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : आयेशा, ईशानंतर विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार?, नवीन प्रोमोमुळे चर्चांना उधाण

View this post on Instagram

A post shared by Snehal Tarde (@snehprat1311)

स्नेहल यांनी हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “सीतापती प्रभू श्रीरामचंद्र यांस साष्टांग दंडवत. प्रभू, त्रेतायुगात तुम्ही १४ वर्षे वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल ४९६ वर्षांसाठी वनवासात धाडले. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केले. नि:शस्त्र भक्तांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यावेळी प्राणांची आहुती दिलेल्या भक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीदेखील लाल झाले” असं म्हणाली.

आणखी वाचा – आलिया भट्टच्या साडीवरील ‘रामायण’ने वेधलं लक्ष, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा

यापुढे तिने असंही म्हटलं की, “कलियुगातील रामायणाचा हा रक्तरंजित अध्याय संपवून, राक्षसी वृत्तींचा पराभव करुन अखेरीस तुम्ही स्वगृही अयोध्येस परतत आहात. प्रभू तुमचे स्वागत असो. आज आम्हा समस्त सनातन हिंदू धर्मियांना, तुमच्या भक्तांना अपार आनंद होत आहे. तुम्ही अयोध्येस परत आला आहात म्हणजे आता या भारतवर्षात रामराज्य पुन्हा सुरु झाले आहे असेच आम्ही सर्वजण मानतो. कलियुगातील या रामराज्यात भारत देश धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक या सर्व स्तरांवर प्रगतीशील होवो, येथे समृद्धी नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सीतापती श्रीरामचंद्र की जय. सनातन हिंदू धर्म की जय. यतो धर्मस्ततो जयः ” असं म्हणत रामभक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे.

Tags: entertainmentpravin tardepravin tarde and snehal tardepravin tarde on ram mandirsnehal tarde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Kranti redkar shared her daughter chhabil’s funny video viral on social media see the details

"मुलांच्या तोंडून स्वामीच बोलतात अन्…", क्रांती रेडकरच्या लेकींनाही आहे स्वामी समर्थांचं वेड, अभिनेत्री म्हणाली, "छबील खेळत असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.