शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सुशांतच्या निधनानंतर तू…”, एक्स बॉयफ्रेंडवरुन विकी जैनने अंकिता लोखंडेला सुनावलं, म्हणाला, “कोणालाही तुझ्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 17, 2024 | 1:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 contestants list and more in marathi

"सुशांतच्या निधनानंतर तू...", एक्स बॉयफ्रेंडवरुन विकी जैनने अंकिता लोखंडेला सुनावलं, म्हणाला, "कोणालाही तुझ्यावर..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये विकी जैन व अंकिता लोखंडे यांच्यातील वाद अधिकच वाढत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे, अभिनेत्री अंकिता लोखंडे विकी जैनच्या आईने सांगितलेल्या गोष्टींपासून सावरू शकत नाही आहे, तर दुसरीकडे, अभिनेत्रीने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर तिच्या पतीला ‘वुमनायझर’ म्हणून टॅग केले आहे. अंकिता लोखंडेच्या आरोपांमुळे ‘बिग बॉस’मध्ये विकी जैनच्या संयमाचा बांध फुटताना दिसत आहे. विकी त्याच्या आईने केलेल्या वक्तव्याला पाठिंबा देत अंकिता लोखंडे व सुशांत सिंग राजपूत याचही नाव त्याने भांडणात घेतलेलं पाहायला मिळत आहे.

नुकतेच ‘बिग बॉस’च्या घरात विकी जैन आयेशा खानबरोबर मस्ती करत असताना अंकिता त्याच्यावर चांगलीच चिडली आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी सततच्या आरोपानंतर विकीही चिडला आणि अंकिता लोखंडेला शिवीगाळ करत म्हणाला, “सुशांत सिंह राजपूतचं निधन हा तुझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यावेळी मी संपूर्ण वेळ तुझ्या पाठीशी उभा राहिलो” असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस १७’च्या घरात जोरदार हाणामारी, मुन्नवर फारुकीने अंकिता लोखंडेच्या नवऱ्याचा गळाच पकडला अन्…; व्हिडीओ व्हायरल

यापुढे सुशांत म्हणाला, “मी तुला त्याच्याबद्दल बोलण्यापासून कधीच रोखले नाही, तुला मुलाखत द्यायची होती तेव्हाही मी तुला मदत केली. तू जे काही मुलाखतीदरम्यान बोलली, तू जे काही सोशल मीडियाद्वारे पोस्ट केलंस तेव्हाही मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. मी कोणालाही तुझ्यावर प्रश्न उपस्थित करु दिले नाहीत. आज तू इथे आहेस आणि माझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत आहेस. मी ‘बिग बॉस’मध्ये करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुझी तक्रार आहे”.

आणखी वाचा – नीना गुप्तांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या लग्नाचा फोटो, लग्नात लेकही होती उपस्थित अन्…; फोटो तुफान व्हायरल

अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून तिने अनेकवेळा सुशांत सिंह राजपूतच्या नावाचा उल्लेख केला आहे. सुशांत सिंह राजपूतबरोबरच्या आठवणी ती बरेचदा अभिषेकबरोबर तर कधी मुन्नवरबरोबर शेअर करत भावूक होताना दिसली. दरम्यान अंकिताच्या तोंडून सुशांतचे नाव वारंवार ऐकल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलेलंही पाहायला मिळालं.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jain fightbigg boss 17entertainmentsushant singh rajputvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Mirzapur 3, maharani 3, ashram 4 web serieses new seasons coming soon see the details

‘मिर्झापुर ३’, ‘महाराणी ३’, अन् ‘आश्रम ४’; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज, कुठे पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.