Bigg Boss 17 Latest News : सलमान खानचा रिऍलिटी शो ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर आला आहे. येत्या २८ जानेवारीला या सीझनचा विजेता घोषित करण्यात येणार आहे. ग्रँड फिनालेचा दिवस अगदी जवळ आला असून घरातील स्पर्धकांमध्ये छेडछाडीची घटना घडलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कमध्ये टीम ए म्हणजेच मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी यांना पहिल्या दिवशी टॉर्चर करण्यात आले, त्यानंतर ‘बिग बॉस’ने दुसऱ्या दिवशी हा टास्क बंद केला. यानंतर मुन्नवर व विकी जैन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे ज्यामध्ये मुन्नवर विकीची कॉलर पकडताना दिसत आहे.
वास्तविक, ‘बिग बॉस १७’च्या आगामी भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये, टॉर्चर टास्कची टीम बी म्हणजेच अंकिता लोखंडे, विकी जैन, आयशा खान व ईशा मालवीय स्वयंपाकघरातील सर्व मसाले लपवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. तिघे मिळून तिखट, गरम मसाला, मीठ ते डिटर्जंटची पाकिटे लपवताना दिसत आहेत. इतकंच नाही तर विकी जैन टास्कमध्ये वापरण्यात आलेल्या बादल्या टेरेसवर फेकतो, ज्याची माहिती मुन्नवरला लागते.
Tomorrow's Episode PROMO #BiggBoss17
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) January 16, 2024
Bigg Boss led Munawar & team to DISQUALIFY Vicky & team from the torture task and nominate them. And Munawar & Vicky FIGHT! pic.twitter.com/m7QdcgqDZe
यावेळी मुन्नवर अभिषेक व मन्नाराबरोबर बादल्या खाली उतरवण्याचा प्रयत्न करतो, परंतु विकी जैन त्यांना तसं करण्यापासून अडवतो. यावेळी मुन्नवर झाडाला अडखळतो. विकी त्यांना थांबवत असतो की विकीची ही कृती पाहून मुन्नवरचा राग खूप वाढतो. या कारणावरुन मुन्नवर थेट विकीचा गळा पकडताना दिसतो. यादरम्यान सर्वजण विकीला वाचवण्यासाठी पुढे येतात, पण मुन्नवर मागे हटत नाही.
नुकत्याच झालेल्या या टॉर्चर टास्कदरम्यान मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा व अरुण मशेट्टी हरले. या टास्कमध्ये आयशा खानने घरातील चारही सदस्यांवर लाल मिरची टाकली, जी टीम ए सहन करु शकली नाही. मन्नारा चोप्रा हिने सर्वप्रथम बजरमधून हात काढला, त्यानंतर अभिषेक कुमारलाही लाल मिरचीची जळजळ सहन झाली नाही. यामुळे चारही जण बाहेर पडले.