२०२४ या नवीन वर्षात ‘मिर्झापूर ३’, ‘आश्रम ४’ व ‘महाराणी ३’सारख्या अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे पुढील सीझन्स प्रदर्शित होणार आहेत. तर जाणून घ्या येत्या नवीन वर्षात कोणत्या वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहेत.
मिर्झापुर ३ : मिर्झापुर या सीरिजचे आतापर्यंत डॉन सीझन्स चाहत्यांच्या भेटीला आले असून चाहते या सीरिजच्या आगामी सीझनची वाट पाहत आहेत. येत्या मार्च २०२४च्या शेवटच्या आठवड्यात ‘मिर्झापूर सीझन ३’ चा प्रीमियर लॉन्च होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या नवीन वर्षात ही लोकप्रिय सीरिज प्रदर्शित होणार आहे. अॅमेझोन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
12th Fail : विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असलेला 12th Fail हा IPS मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपट आहे. परिस्थितीने पराभूत झालेला मुलगा आपल्या मेहनतीने आयपीएस अधिकारी कसा बनतो? हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
महाराणी ३ : २०२१ मध्ये आलेल्या ‘महाराणी’ वेबसीरिजने प्रेक्षकांना वेड लावले. यामध्ये हुमा कुरेशी, सोहम शाह, अमित सियाल यांच्यासह अनेक स्टार्सनी जबरदस्त मनोरंजन केले. आता वेब सीरिजचा तिसरा सीझन येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून लवकरच ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ही सीरिज केव्हा प्रदर्शित होईल याची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. परंतू, या लवकरच ही सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
आश्रम ४ : बॉबी देओलसाठी २०२३ हे लाभदायी ठरले. यावर्षी बॉबी देओल हा ‘अॅनिमल’ चित्रपटाने खूप चर्चेत आला. यापूर्वी त्याची ‘आश्रम’ ही वेबसीरिज खूपच गाजली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले असून येत्या नवीन वर्षात ‘आश्रम’चा चौथा सीझनही प्रदर्शित होणार आहे.