शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यंदाची संक्रांत पियुष रानडेसाठी आहे खूप खास, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “या दिवशी आम्ही दोघेही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Piyush Ranade and Suruchi Adarkar Makarsankrant

यंदाची संक्रांत पियुष रानडेसाठी आहे खूप खास, स्वतःच खुलासा करत म्हणाला, "या दिवशी आम्ही दोघेही…"

अभिनेता पियुष रानडे व सुरुची अडारकर यांच्या लग्नाच्या बातमीने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. सुरुची व पियुषच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो साऱ्यांच्या पसंतीस उतरले. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला आहे. लग्नासाठी सुरुची व पियुष यांचा खास लूक पाहणं रंजक ठरलं. दोघंही लग्नानंतरचं आयुष्य मजेत जगताना पाहायला मिळत आहेत. (Piyush Ranade and Suruchi Adarkar Makarsankrant)

सुरुची अडारकरचं हे पहिलं लग्न आहे तर पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. याआधी पियुषची दोन्ही लग्न असफल ठरली आहेत. सुरुची व पियुष लग्नानंतरचं त्यांचं आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरुची व पियुष त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत दोन दिवसासाठी फिरायला गेल्याच समोर आलं. फिरून आल्यावर दोघेही कामाला लागले आहेत. आज संक्रांत असून सुरुची व पियुष यांची लग्नानंतरची ही पहिली संक्रांत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुमची औकात आहे का?”, अंकिताने विकीजवळ केली त्याच्या आई-वडिलांची तक्रार, नेटकरी म्हणाले “खूप गर्विष्ठ कुटुंब…”

यंदाची संक्रांत पियुषसाठी खूप वेगळी व स्पेशल आहे याबाबत नुकत्याच दिलेल्या ‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत त्याने भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना पियुष म्हणाला, “ती पण शूट करत आहे आणि मी पण शूट करत आहे. आमची संक्रांत खूप चांगली आहे कारण आम्ही दोघेही काम करत आहोत. जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा आमच्यासाठी कोणताच सण हा त्या दिवसापुरता मर्यादित नाही आहे. रोज संक्रांत, रोज दिवाळी आहे, रोज होळी आहे, रोज व्हॅलेंटाईन डे आहे. आता आपल्या प्रमाणे त्या त्या दिवसाला त्या त्या सणाचे महत्त्व दिलं आहे. एक जोडी म्हणून वा मित्र-मैत्रीण म्हणून आम्ही रोजचा दिवस हा सणासारखाच साजरा करतो” असं तो म्हणाला.

आणखी वाचा – चित्त थरारक दृश्ये, शहारे अन्…; दीपिका-हृतिकच्या ‘फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “ब्लॉकबस्टर…”

पियुष सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर सुरुचीने “सातव्या मुलीची सातवी मुलगी” या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. लग्नानंतर सुरुचीसाठी मालिकेची आलेली ही ऑफर सुवर्णसंधी आहे.

Tags: marathi actormarathi actressPiyush Ranadepiyush ranade and suruchi adarkar makarsankrantpiyush ranade makarsankrantSuruchi Adarkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar shared photo with her daughter on Instagram see the details

"आपल्या उंचीला आल्या अन्...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने केलेली पोस्ट लक्षवेधी, खास फोटो शेअर करत म्हणाली, "बघता बघता..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.