शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
are you divorced? Social media user asked to question to actress jui gadkari on Instagram see the details

"तुझा घटस्फोट झाला आहे का?", जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, "अहो लग्न..."

स्टार प्रवाह वहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. गेले अनेक आठवडे टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल ठरत आहे. याच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सायली या भूमिकेतून जुई ही नेहमीच चर्चेत राहते. त्याचबरोबर जुई ही तिच्या सोशल मीडियाद्वारेदेखील कायमच चर्चेत राहत असते.

जुई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते आणि  चाहतेदेखील तिच्याविषयीच्या प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यात उत्सुक असतात. अशातच सायलीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रश्नउत्तराचा एक खास सेगमेंट खेळला. यात तिला चाहत्यांनी तिच्याविषयी आणि तिच्या लग्नाविषयी अनेक् प्रश्न विचारले आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांनादेखील जुईने तिच्या खास शैलीत उत्तरे दिली.

हेही वाचा – “तारीख काय ठरली”, रिंकू राजगुरू व आकाश ठोसरच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, “पळून लग्न…”

यांपैकी एका प्रश्नाने जुईसह साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यात जुईला तिच्या एका चाहत्याने “तुझा घटस्फोट झाला आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर जुईनेदेखील या नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत असे म्हटले की, “अहो, घटस्फोट व्हायला आधी लग्न तर होऊद्या.” दरम्यान नेटकऱ्याच्या या प्रश्नाने जुईलादेखील बुचकळ्यात पाडले आहे. जुईने या खास प्रश्नाचे उत्तर देत हसण्याचे व एक वैतागलेल्या बाईचे खास एमोजी सेंड केले आहेत.

हेही वाचा – मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या जुई गडकरीने व्यक्त केली चित्रपटात काम करण्याची इच्छा, म्हणाली, “कोणी ऑफर…”

दरम्यान, जुईने तिच्या चाहत्यांच्या अशा अनेक हटके प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे मनोरंजन केले आहे. तसेच या प्रश्नोत्तराच्या खेळात तिच्या अनेक चाहत्यांनी ती लग्न कधी करणार आहे? याविषयीचे अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे जुई आता कधी लग्न करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  

Tags: jui gadkarimarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialTharla Tar Magजुई गडकरीठरलं तर मगमराठी अभिनेत्रीमराठी बातम्यामराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातम्यामराठी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "त्यांचं नातं खराब…", अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यावर उषा नाडकर्णींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, "अधिक समस्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.