शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेने सासूसमोर केला विकी जैनबरोबरच्या नात्याचा खुलासा, म्हणाली, “तुम्ही कधीच आमच्याबरोबर राहिला नाहीत म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2024 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

अंकिता लोखंडेने सासूसमोर केला विकी जैनबरोबरच्या नात्याचा खुलासा, म्हणाली, "तुम्ही कधीच आमच्याबरोबर राहिला नाहीत म्हणून…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ सुरु झाल्यापासून अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या सततच्या भांडणामुळे चर्चेत आहे. या जोडीमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अनेकदा भांडणे झाली, कालांतराने ही भांडण मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळाली. अलीकडे झालेल्या भांडणात दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याबाबत ही चर्चा केली होती. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात सध्या फॅमिली विक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अंकिता व विकी या दोघांच्या आई त्यांना भेटायला आल्या होत्या.

समोर आलेल्या भागात अंकिताची आई व सासूबाई यांनी केलेला संवाद विशेष लक्षवेधी ठरला. अंकिताने तिच्या सासुसह विकीबरोबरच्या नातेसंबंधाबद्दल भाष्य केलं. अभिनेत्री म्हणाली की, “तिच्या वैवाहिक नात्यात चूक करणारी ती एकटीच नव्हती”. विकी जैनच्या आईशी बोलताना अंकिता लोखंडे भावूक झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर अंकिता लोखंडेने विकी जैनच्या आईकडे येत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “विकीच्या कुटुंबाला…”, सुशांत सिंह बद्दल सतत बोलण्यावरून अंकिता लोखंडेला तिच्याच आईने टोकलं, म्हणाल्या, “तुझा नवरा…”

आधी विकी जैनच्या आईने अंकिता जैनशी बोलण्यास नकार दिला, पण नंतर दोघांमध्ये बोलणे झाले. अभिनेत्री तिच्या सासूला म्हणाली, “मम्मा, माझी एकटीची चूक आहे, अस नाही आहे. मला असे म्हणायचे आहे की, दोन्ही बाजूंनी गोष्टी घडल्या आहेत”. अंकिता पुढे म्हणाली, “मी घरी जशी आहे, अगदी इथेही तशीच आहे. तुम्ही माझ्याबरोबर कधीच राहिला नाहीत त्यामुळे तुम्हाला माहीत आम्ही कसे राहतो आणि विकी कसा राहतो. म्हणूनच मला हे सांगणे महत्त्वाचे वाटते की आम्ही अशीच मज्जा मस्ती करत राहतो”.

आणखी वाचा – सिद्धार्थ-सईचा लिपलॉक, धमाल कॉमेडी अन्…; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

यापुढे बोलत अंकिता लोखंडे म्हणाली, “या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम होत आहे की, माझे कुटुंबीय मला समजू शकत नाही. मम्मा, मला खरंच हात जोडून तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मी माफी मागते”. दरम्यान, विकी जैनही खोलीत येतो आणि त्याच्या आईला समजावू लागतो.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

लाडकी लेक आयराच्या लग्नाबाबत आमिर खानने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, म्हणाला, "थोडा आनंद अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.