शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहता येणार ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
killer soup extra ordinary man mission impossible 7 echo upcoming ott releases this week see the details

येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहता येणार ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

२०२४ या नवीन वर्षाची सुरुवात झाली असून हे नवीन वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीनेदेखील अधिकच सकस आहे. येत्या नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्याच आठडव्यात ओटीटीवर अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रदर्शित झाले. त्यांतर आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेक उत्तमोत्तम चित्रपट व वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसीरिज आणि चित्रपट पाहता येतील. तर जाणून घ्या ही संपूर्ण यादी…

(१) किलर सूप : मनोज बाजपेयी व कोंकणा सेन शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेली क्राइम थ्रिलर वेबसिरीज ‘किलर सूप’ येत्या ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजची कथा प्रभाकर (मनोज बाजपेयी) आणि स्वाती (कोंकणा सेन शर्मा) यांची असल्याचे बोलले जात आहे. उमेश आणि स्वाती यांचे एकमेकांवर प्रेम आहे. स्वातीचे शेफ बनण्याचे स्वप्न आहे. पण एका हत्येनंतर यांचे आयुष्यच बदलून जाते. अभिषेक चौबे दिग्दर्शित ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

(२) एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन : हा चित्रपट १२ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात अभि नावाची व्यक्ती आहे ज्याला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे आणि तो जेव्हा मोठा होतो, तेव्हा तो एक कनिष्ठ कलाकार बनतो. पण जेव्हा तो एका कंपनीच्या एमडी लिकिथाच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याच्या रील आणि वास्तविक जीवनाला एक विचित्र वळण मिळते. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर यांच्या भूमिका आहेत.

आणखी वाचा – नांदेडमध्ये पराठा, लस्सीवर संकर्षण कऱ्हाडेने मारला ताव, गुरुद्वारामध्ये दर्शनही घेतलं, फोटो शेअर करत म्हणाला, “पंजाबी धाब्यावर…”

(३) इको : इको सीरिजची कथा ही माया या पात्राभोवती फिरणारी आहे.  जी तिच्या घरी परतते आणि तिच्या लोकांबरोबर नवीन नाते निर्माण करते. या सीरिजमध्ये अलक्वा कॉक्स ही अभिनेत्री मायाची भूमिका साकारत आहे. मायाच्या जन्मगावी जे काही घडलं त्याचा संदर्भ आपल्याला या सीरिजमधून पहायला मिळणार आहे. ११ जानेवारीला ‘डिझ्नी प्लस हॉटस्टार’वर ही वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे.

(४) मिशन इम्पॉसिबल ७ : ‘मिशन इम्पॉसिबल’ च्या ७व्या भागात इथन हंटची भूमिका अभिनेता टॉम क्रूझने केली आहे. जो पुन्हा एकदा आपल्या नव्या मिशनवर निघाला आहे. ही सीरिज येत्या ११ जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मिशन इम्पॉसिबलच्या आधीच्याही सीरीजलाही चाहत्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता.

आणखी वाचा – “त्यांच्यामधील भांडणं…”, सासरकडून अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाला होता विरोध, सासूचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्या दोघांचं नातं…”

(५) द लीजेंड ऑफ हनुमान ३ : ही सीरिज भगवान हनुमानाच्या कथेवर आधारित आहे, ज्यात सीतेला वाचवण्यासाठी हनुमान रामाला कशी मदत करतात हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजच्या दोन सीजननंतर या सीरिजचा आता तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द लीजेंड ऑफ हनुमान’चा तिसरा सीझन हा येत्या १२ जानेवारी रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bollywood entertainmentBollywood entertainment newsEchoentertainment newsExtra Ordinary Mankiller soupMission Impossible 7ott newsThe Legend of Hanuman 3इकोएक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅनओटीटी बातमीकिलर सूपद लीजेंड ऑफ हनुमान 3बॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीमिशन इम्पॉसिबल 7
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "तिची सासू तिला…", विकी जैनच्या आईने अंकिता लोखंडेला दिलेली वागणूक पाहून कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, "कुटुंबाला तोडण्याचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.