शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांच्यामधील भांडणं…”, सासरकडून अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाला होता विरोध, सासूचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्या दोघांचं नातं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 10, 2024 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

"त्यांच्यामधील भांडणं…", सासरकडून अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाला होता विरोध, सासूचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "त्या दोघांचं नातं…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमधील खेळ अधिकच रंजक झाला आहे. या शोमधील विकी जैन व अंकिता लोखंडे हे कपल या शोचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली. या जोडीने या शोमध्ये एंट्री केल्यापासून त्यांच्यात वाद सुरु असलेला पाहायला मिळाला. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे.

या फॅमिली वीकमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात विकी जैन व अंकिता लोखंडे यांच्या आईंनी हजेरी लावली होती. कौटुंबिक आठवडा असल्याने, अंकिता व विकी यांची आई श्वेता लोखंडे व रंजना जैन यांनी घरात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी अंकिता व विकी यांना त्यांच्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व काम करण्यासाठी मार्गदर्शन केले.

आणखी वाचा – “असं काय खास असतं?”, ३१ डिसेंबरची गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी पाहता शशांक केतकरची पोस्ट, म्हणाला…

अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या नात्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘पिंकविला’ने विकीची आई रंजना जैन यांच्याशी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, अंकिताने असं नमूद केले होते की तिला खूप लवकर निर्णय घेतल्याबद्दल पश्चाताप होत आहे. अंकिताने विकीबरोबरच्या लग्नाचे संकेत दिल्याने तिला त्याच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होत असल्याचं समोर आलं.

View this post on Instagram

A post shared by Tadka Bollywood (@tadka_bollywood_)

आणखी वाचा – ‘बॉइज’ चित्रपट फेम अभिनेता करणार दिग्दर्शनात पदार्पण, ‘या’ नाटकाद्वारे नव्या इनिंगला सुरुवात

‘पिंकविला’ने विकी जैनची आई रंजना जैन यांना अंकिताच्या या वक्तव्याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, “अंकिताशी लग्न करणं हा विकीचा निर्णय होता. आमचा त्यांच्या लग्नाला पाठिंबा नव्हता. लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी त्याचा होता, हे लग्न त्याला टिकवायचं आहे त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल आम्हाला काहीही देणंघेणं नाही. टीव्हीवर आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो तरीही दोघांना काहीच बोलत नाही. ‘बिग बॉस’ संपल्यावर त्या दोघांचं नातं सुधारण्यासाठी विकी प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. विकी-अंकिताने आता गेमपेक्षा जास्त त्यांच्या नात्यावर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्यामधील भांडणं सगळ्यांनीच पाहिली पण, आता त्या दोघांचं प्रेम सगळ्यांना दिसलं पाहिजे. तेव्हाच त्यांच्या नात्यावर लोकांना विश्वास बसेल” असं रंजना जैन यांनी सांगितलं.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmententertainment newsvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
actor sankarshan karhade visited nanded gurdwara and shared pictures of himself eating lassi and aloo ka paratha on instagram.

नांदेडमध्ये पराठा, लस्सीवर संकर्षण कऱ्हाडेने मारला ताव, गुरुद्वारामध्ये दर्शनही घेतलं, फोटो शेअर करत म्हणाला, "पंजाबी धाब्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.