शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : सासूबाईंची वागणूक पाहता अंकिता लोखंडेला बसला धक्का, विकीचेही सूर बदलले, अभिनेत्री म्हणाली, “मला वाटलं तुम्ही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 9, 2024 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg Boss 17

सासूबाईंची वागणूक पाहता अंकिता लोखंडेला बसला धक्का, विकीचेही सूर बदलले, अभिनेत्री म्हणाली, "मला वाटलं तुम्ही…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा रिऍलिटी शो सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाने स्वतःची अशी जागा प्रेक्षकांच्या मनात तयार केली आहे. या सीझनमधील अंकिता लोखंडे व विकी जैन हे कपल विशेष राहिले. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून दोघांमध्ये सुरु झालेला वाद आता विकोपाला पेटला आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. स्पर्धकांचे जवळचे व प्रिय लोक शोमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय स्पर्धकांसह ते दर्जेदार वेळ घालवताना दिसणार आहेत.

जवळपास तीन महिन्यांनंतर स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियांना भेटायला मिळणार आहे. ताज्या सोशल मीडिया पोस्ट्सनुसार, अंकिता लोखंडेची आई ‘बिग बॉस १७’च्या घरात प्रवेश करणारी पहिली व्यक्ती ठरली. त्यानंतर विकी जैनच्या आईला ‘बिग बॉस १७’च्या घरात प्रवेश करताना दिसली. समोर आलेल्या व्हिडीओ व फोटो पाहता असे दिसत आहे की, अंकिता लोखंडेने तिच्या सासू-सासऱ्यांसह मजा केली. मात्र हे अभिनेत्रीच्या अपेक्षेच्या विरुद्ध आहे.

आणखी वाचा – मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाने धरला ठेका, मराठी कलाकारांसह केला जबरदस्त डान्स

#Livefeed #VickyJain’s mom in the House!!
Full on Fun going on????#BiggBoss17 #bb17 #abhishekkumar #AbhishekAvengers #AyeshaKhan #MunawaraFaruqui #AnkitaLokhande #MannaraChopra pic.twitter.com/3KQusznTR7

— Muhammad Noman (@noman00019) January 8, 2024

‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार, अंकिता लोखंडेला अपेक्षा होती की तिची सासू तिच्यावर ओरडेल पण त्याउलट ती सुनेचे लाड करताना दिसली. सूत्रांनी पोर्टलला माहिती दिली आहे की, अंकिता लोखंडेने तिच्या सासूला घरात प्रवेश करताना पाहिले तेव्हा ती खूप घाबरली. अंकिता व विकी हे ‘बिग बॉस १७’च्या घरात सतत भांडत असतात त्यामुळे अभिनेत्रीला वाटले की तिला यासाठी ओरडण्याचा येईल. मात्र, तसे झाले नाही. अंकिताने ‘मम्मी मला वाटलं तुम्ही मला ओरडाल’ असं म्हटलं. यावर, विकीच्या आईने, “असे का केले” असं विचारत उत्तर दिलं आणि अंकिताला गोष्टींची काळजी करु नका असंही सांगितल. विकीच्या आईने तर अंकिताला तिच्या मांडीवर बसवलं आणि तिचे लाड केले.

आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये लगीनघाई! आयरा-नुपूर नंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्रीदेखील अडकणार विवाहबंधनात, तारीखही आली समोर अन्…

ट्विटर आलेल्या पोस्टवर, ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे, तिची आई, सासू व इतर स्पर्धक एकत्र हसताना पाहताना मिळाले. चाहत्यांना काही अनपेक्षित घडण्याची अपेक्षा होती, परंतु तसे होताना दिसत नाही आहे.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainankita lokhande mothet in lowbigg bossbigg boss 17entertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss 17 after kicking her husband, the mother-in-law angry on ankita lokhande new video viral on social media

Bigg Boss 17 : नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या "तुम्ही तुमच्या नवऱ्याला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.