Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. १० जानेवारीला आयरा खान व नुपूर शिखरे यांचा राजस्थान मधील उदयपूर येथील आलिशान हॉटेलमध्ये शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. आयरा खान व नुपूर शिखरे हे जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व मित्र परिवारासह उदयपूर येथील ताज पॅलेस येथे लग्नाची तयारी करताना दिसत आहेत. काल आयराचा मेहंदीसोहळा संपन्न झाला. आयराच्या हातावर नुपूरच्या नावाची मेहंदी रंगली.
मेहंदी सोहळ्यासाठी आयरा-नुपूरने केलेल्या खास लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयराने डिझाइनर ब्लॉउज व ऑफ व्हाइट रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहंग्यावर तिने महागडी ज्वेलरी घातलेली पाहायला मिळाली. तर नुपूरने मरुन नेहरू जॅकेट व फिकट गुलाबी रंगाच्या कुर्ता परिधान केला होता. या लूकमध्ये नुपूर खूप हँडसम दिसत होता. आयरा-नुपूरचा मेहंदी समारंभातील हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. मेहंदी सोहळ्यात धमाल मस्ती करत डान्स करतानाचा नुपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नुपूर काही मराठी कलाकारांबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
आयरा-नुपूरच्या मेहंदी सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुरुवातीला आयरा आपल्या मैत्रिणींबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर बादशाहच्या लोकप्रिय ‘जुगनू’ गाण्यावर नुपूर त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर थिरकताना दिसत आहे. नुपूरसह काही मराठी कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मेनन, अभिनेत्री मिथिला पालकरसह नुपूर ‘जुगनू’ गाण्याची हूक स्टेप करत आहे.
आयरा खानच्या लग्नाला आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव व रीना दत्ता यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. दोघींनी लग्नापुर्वीच्या विधींपासून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नुपूर शिखरेकडे हळदी समारंभालाही दोघींनी उपस्थिती दर्शविली. यावेळी किरण राव व रीना दत्ता यांचा नऊवारी साडीतील महाराष्ट्रीयन लूक लक्षवेधी ठरला. खान कुटुंबियांच्या लग्नात सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनीही उपस्थिती दर्शविली होती.