शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अ‍ॅनिमल’ नंतर नव्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर, रोहित शेट्टीबरोबर करणार काम, नवा लूक चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2024 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
animal fame actor ranbir kapoor in police uniform with director rohit shetty photos viral on social media

'अ‍ॅनिमल' नंतर नव्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर, रोहित शेट्टीबरोबर करणार काम, नवा लूक चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा चांगलाच चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे अभिनेत्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. अजूनही काही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जवळपास ९०० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना रणबीर च्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली होती. (Ranbir Kapoor And Rohit Shetty)

अशातच रणबीर कपूरचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो पोलिसांच्या गणवेशात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हायरल फोटोमध्ये रणबीरचा नवीन लूक समोर आला आहे. या फोटोमधील पोलिसाच्या लूकबरोबच त्याच्या मोठ्या मिशांना पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. रणबीरचा हा खास लूक पाहून अनेकांनी तो रोहट शेट्टीच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र रणबीर व रोहित हे त्यांच्या आगामी चित्रपटसाठी नाही तर एका जाहिरातीसाठी एकत्र आल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse)

आणखी वाचा – Video : …अन् आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीला सगळ्यांसमोर केलं किस, लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यामधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पण रणबीरला या खास लूकमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. रणबीर व रोहित हे दोघे एकत्र चित्रपट नाही तर जाहिरात करत असल्यामुळे अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या व्हायरल फोटोमुळे अनेकांनी रणबीरला लवकरच या लूकमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अनेकांनी रोहित व रणबीर यांनी मिळून असाच काहीसा चित्रपट घेऊन येण्याची विनंतीही केली आहे. तसेच या व्हायरल फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसादही दिला आहे.    

आणखी वाचा –  नवरी नटली पण आमिर खानच्या जावयाने जिमच्याच कपड्यांमध्ये केलं लग्न, अनेक पाहुणेही होते उपस्थित, खास लूकची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी व विवेक ओबेरॉयसारखे हे कलाकार दिसणार आहेत. तर रणबीर सध्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. अजूनही काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट चालू असल्याचे म्हटले जात आहे.

Tags: bollywoodbollywood newsentertainment newsnew projectranbir kapoorrohit shetty
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ira Khan-Nupur Shikhare Wedding

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : शॉर्ट पँट-बनियनवर नवरा, तर आमिर खानच्या लेकीनेही परिधान केला साधाच लेहंगा; इराच्या लग्नाची अजब गोष्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.