Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आयरा खान व नुपूर शिखरे यांचा ३ जानेवारी रोजी शाही विवाहसोहळा संपन्न झाला. आयरा व नुपूर यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा उरकला. अगदी मराठमोळ्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने या विधी पार पडल्या. दोन दिवसांपासून दोघांच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत होती.
नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकत असताना नूपुरच्या हटके स्टाईलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुपूर लग्नमंडपात थेट जिमच्याच कपड्यांमध्ये पोहोचला. त्यामुळे आमिर खानचा जावई नुपूर शिखरे विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. नुपूर शिखरे हा फिटनेस फ्रिक असून उत्तम जिम ट्रेनर आहे. त्यानंतर दोघांचा शाही रिसेप्शन सोहळा ही पार पडला. आयरा व नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळयाला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
आयरा खानने लग्नात धोती चोली ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने या ड्रेसवर कोल्हापुरी चप्पल परिधान केली होती. तर नुपूरने रिसेप्शनसाठी कुर्ता पायजमा असा साधा लूक केला होता. आयरा व नुपूरच्या रिसेप्शन लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांच्याही साध्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच आमिर खान व त्याच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी यांचीही या लग्नाला उपस्थिती होती.
६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. या रिसेप्शन सोहळ्यात शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व मोठे कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयरा-नुपूर यांच्या लग्नात अनेक पाहुण्यांची वर्णी लागली असल्याचे पाहायला मिळाले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.