गेल्या काही महिन्यांमध्ये काही मराठी अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्या. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. काही दिवसांपूर्वी गौतमी व स्वानंद तेंडुलकरचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. गौतमी व स्वानंदच्या लग्नाची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली. पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केलं. तसेच या लग्नासाठी त्यांनी अवाढव्य खर्चही केला. लग्नानंतर दोघंही कोकणात फिरायला गेले होते. आता ते कोकणातून पुन्हा त्यांच्या घरी परतले आहेत. दरम्यान गौतमीचा पती व मृण्मयीचा पती यांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मृण्मयी देशपांडेचं बहीण गौतमीच्या पतीशी अगदी मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पाहायला मिळालं. लग्नातही मृण्मयी गौतमी व तिच्या पतीच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. लग्नानंतरही देशपांडे सिस्टर्स त्यांच्या पतीसह धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. गौतमी-स्वानंद, मृण्मयी-स्वप्नील एका कौटुंब कार्यक्रमासाठी एकत्र जमले होते. कुटुंबातील मृण्मयी-गौतमीच्या कुटुंबातील सदस्याचा साखरपुडा होता. या साखरपुड्यासाठी दोघींचेही पती आले होते.
आणखी वाचा – आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण?, करतो ‘हे’ काम, बड्या सेलिब्रिटींशी खास नातं अन्…
मृण्मयीने याच कार्यक्रमातील स्वप्नील व स्वानंदाचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली. या फोटोमध्ये दोघंही अगदी सारखेच दिसत आहेत. तसेच फोटो पाहून काहींनी हे तर जुळे भाऊ असल्याचं म्हटलं आहे. मृण्मयी म्हणाली, “फोटोमधील आठ फरक ओळख आहे एक हजार रुपये मिळवा”. मृण्मयीच्या या पोस्टवर अनेकांनी गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. तर मृण्मयीनेही कमेंट करणाऱ्यांना उत्तरं दिली आहेत.

एका नेटकऱ्याने म्हटलं की, “या दोघांना एकाच कंपनीचे प्रॉडक्ट विकण्यात आले आहेत”. यावर मृण्मयी कमेंट करत म्हणाली, “नाही दोन वेगळ्या कंपन्यांनी सारखे प्रॉडक्ट्स काढले आहेत”. तर काहींनी दोघांमधील आठ फरक सांगितले आहेत. त्यांना मृण्मयीने “गौतमीकडून पैसे घ्या” असं म्हटलं आहे. पण मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वानंद व स्वप्निल अगदी सारखेच दिसत आहेत एवढं नक्की.