शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 2:47 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor saagar karande celebrated his birthday in bus video viral on social media

Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलंही आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागरने त्याच्या खास शैलीत सादर करत एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सागरने अचूकपणे केले आहे. (Saagar Karande On Instagram)

सागर त्याच्या विनोदी अभिनयाने जितका चर्चेत असतो. तितकाच तो सोशल मीडियावदेखील सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या कामानिमित्त काही फोटो पोस्ट करत असतो तर कधी त्याचे वैयक्तिक फोटो व व्हिडीओदेखील शेअर  करत असतो. अशातच काल (१ जानेवारी) रोजी सागरचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन त्याने त्याच्या नाटकातल्या कलाकारांबरोबर साजरा केला. रंगभूमीवर त्याचे सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक चालू असून या नाटकाच्या प्रयोगानिमित्त तो प्रवास करत असताना नाटकाच्या बसमध्येच त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Rutuja Kulkarni ???????? (@rutuja.coolkarni)

आणखी वाचा – मावळता सूर्य, रोमँटिक गप्पा अन्…; एकमेकांच्या प्रेमात हरवले नारकर कपल, खास व्हिडीओ केला शेअर

अभिनेता दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला नाटकाचा प्रयोग करत वाढदिवस साजरा करतो आणि यंदाही त्याने हीच पद्धत कायम ठेवत त्यांचा यंदाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या नाटकाची संपूर्ण टीम होती. नाटकाच्या संपूर्ण टीमसह सागरने नाटकाच्या बसमध्येच केक कापत मोठ्या उत्साहात व जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवस व नवीन वर्षांचा पहिला दिवस असा सुंदर योग जुळून येत असल्यामुळे त्यादिवशी प्रयोग केल्याने एक नवीन ऊर्जा मिळते असं तो आवर्जून सांगतो.

आणखी वाचा – Video : लग्नानंतर कोकणात नवऱ्यासह गौतमी देशापांडेची धमाल-मस्ती, समुद्रामध्ये केलं Flyboarding, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, सागर सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’  या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या नाटकाला प्रेक्षकांचादेखील तुफान प्रतिसाद मिळत आहे. सध्या या नाटकाची १५०व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अशातच सागर येत्या काळात काही नवीन चित्रपटांतूनदेखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.  

Tags: entertainmententertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi newssagar karande
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prajakta mali New Video

Video : डोक्यावर ग्लास ठेऊन डान्स, चुलीवर जेवण अन्…; कुटुंबियांबरोबर प्राजक्ता माळीची धमाल पार्टी, साधेपणाचं चाहत्यांना कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.