मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : डोक्यावर ग्लास ठेऊन डान्स, चुलीवर जेवण अन्…; कुटुंबियांबरोबर प्राजक्ता माळीची धमाल पार्टी, साधेपणाचं चाहत्यांना कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 2, 2024 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta mali New Video

Video : डोक्यावर ग्लास ठेऊन डान्स, चुलीवर जेवण अन्...; कुटुंबियांबरोबर प्राजक्ता माळीची धमाल पार्टी, साधेपणाचं चाहत्यांना कौतुक

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यानेही तरुणाईला भुरळ घातली आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. प्राजक्ताच्या या कार्यक्रमातील सूत्रसंचालनाचे अनेक चाहते दिवाने आहेत. प्राजक्ता अभिनयाबरोबर उत्तम कवयित्री, नृत्यागंणा व सूत्रसंचालिकासुद्धा आहे. एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका आहे. (Prajakta mali New Video)

प्राजक्ताचा स्वतःचा प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रँड असून ती मराठमोळे पारंपरिक नवीन दागिने लाँच करत असते. सोशल मीडियावरही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. हटके फोटोशूटमुळे प्राजक्ता नेहमीच चर्चेत असते. शिवाय कुटुंबाबरोबरचेही अनेक व्हिडीओ, फोटो ती पोस्ट करताना दिसते. अशातच अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या कुटुंबाबरोबरच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नववर्षाचे स्वागत करत मागील वर्षाला निरोप देत हा दिवस साजरा केला आहे. प्राजक्ताने ३१ डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन कुटुंबियांसह धुमधडाक्यात केलं आहे. कुटुंबाबरोबर धमाल मस्ती करतानाच व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, “३१ डिसेंबर संदर्भातील आमचे बॉबी देओल व डॉन २०२३चा शेवटचा आणि २०२४चा पहिला सेल्फी, नवीन वर्षातली पहिली पोस्ट. नवीन वर्षाच्या शुभेच्छा” असं कॅप्शन देत कुटुंबाबरोबर धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तुला काय काय सहन करायचं आहे हे…”, मुग्धाच्या भावंडानी पिळला प्रथमेशचा कान, मेहुणी म्हणाली, “आमच्या बहिणीला…”

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबियांसह ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या ‘जमाल कडू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर ती ‘डॉन’ या गाण्यावरही थिरकताना दिसली. या गाण्यांवर प्राजक्तासह तिचे कुटुंबीयही धमाल मस्ती करत थिरकताना दिसले. शिव्या या व्हिडीओमध्ये प्राजक्ता चुलीशेजारी बसून भाकऱ्या बनवताना दिसत आहे. प्राजक्ताने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “सारं काही बाजूला ठेवून ,सर्वांच्यात मिसळते म्हणून तर ‘प्राजक्ता’नव्याने कळते” असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.

Tags: entertainmentmarathi actressmhjprajakta maliprajakta mali video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Shiv Thakare Shared Goodnews

३० लाखांची गाडी खरेदी केल्यानंतर शिव ठाकरेने घेतलं मुंबईत हक्काचं घर, म्हणाला, "आयुष्यभर झगडावं लागतं कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.