शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला कोणी…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची रोमँटीक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तो संपूर्ण…”

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 17, 2023 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia shares birthday post for husband Riteish

Genelia shares birthday post for husband Riteish

बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने आपल्या अभिनयातून मराठीसह बॉलिवूडलाही भूरळ पाडली आहे. मराठीतील ‘वेड’ सारख्या चित्रपटातून त्याने सगळ्या प्रेक्षकांना त्याच्या अभिनयातून वेड लावलं आहे. अशा या सगळ्यांच्या लाडक्या रितेश दादाचा आज ४५वा वाढदिवस आहे. या निमित्त त्याला सगळीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण त्याच्या लाडक्या बायकोने त्याच्यासाठी खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एक  रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत तिने तिच्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवासानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. (Genelia shares birthday post for husband Riteish )

रितेश-जिनिलीया हे जोडपं बॉलीवूडमधील क्युट जोडप्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप आवडते. या जोडप्याची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली. पुढे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१२मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. आज जिनिलीयाच्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने दोघांचा सुंदर फोटो शेअर करत रितेशसाठी खास पोस्ट लिहीली आहे. जिनिलीया लिहीते, “जर रितेश देशमुख कोण आहे? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर मी एवढंच सांगेन की, तो संपूर्ण जगातला खूप चांगला माणूस आहे आणि तो फक्त माझा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा!”, अशी गोड पोस्ट शेअर केली आहे. रितेशनेही अगदी प्रेमळ कमेंट करत लिहीतो, “आय लव्ह यू बायको, तू माझ्यासाठी काय आहेस याची कदाचित तुला त्याची कल्पानाही नसेल. तू माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनवलंस”, असं लिहीत त्याने तिच्या शुभेच्छांवर आभार व्यक्त करत तिच्यासाठी हा गोड मॅसेज लिहिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला रुग्णालयामधून घरी कधी सोडणार?, जवळच्या मित्राने सांगितलं आता कशी आहे अभिनेत्याची परिस्थिती

सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकारांनीही लाईक, कमेंट करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरसह इतर कलाकरांनीही ‘हॉपी बर्थडे’ लिहीत त्याला वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – जंगी पार्टी, आकर्षक सजावट अन्…; रवी जाधवांनी दणक्यात साजरा केला लग्नाचा २५वा वाढदिवस, व्हिडीओने वेधलं लक्ष

रितेश-जिनिलीया ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनाही महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणूनही ओळखलं जातं. हे कपल सोशल मीडियावरही बरंच सक्रिय असते. विविध विनोदी रिल्स, लेकांचे व्हिडीओ स्टोरी रुपात शेअर करत असतात. त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक फोटोंना, व्हिडीओंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असतं.यांपैकी एक आहे. या दघाी एक आहे.

Tags: bollywood actressgenelia deshmukhriteish deshmukh
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sai lokur became the mother she share post

'बिग बॉस' मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर झाली आई, कुटुंबात चिमुकलीचं आगमन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.