मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते व दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. त्यांच्या कलाकृती नेहमी आगळ्यावेगळ्या व प्रत्येकाला आपल्याश्या वाटाव्या अशा असतात. ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू व प्राजू असो किंवा सुश्मिता सेनच्या ‘ताली’ सीरिजमधील प्रत्येक पात्र असो. रवी यांच्या वेगळेपणाचं कौतुक प्रत्येक प्रेक्षक करताना दिसतात. विविध कथा दिग्दर्शित करणाऱ्या या दिग्दर्शिकाच्या आयुष्यातील प्रेमाच्या कथेचा आरंभ ५ डिसेंबर १९९८साली मेघना यांच्याशी लग्न करुन झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या लग्नाचा २५वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Ravi jadhav 25th marriage anniversary celebration)
त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस ५ डिसेंबरला झाला. यादिवशी त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीबरोबरचे मागील २५ वर्षांतील खास क्षणांचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते. आता त्यांनी त्यादिवशीच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी रवींनी त्यांच्या पत्नी मेघनाला खास सरप्राईज दिलं होतं. यावेळी त्यांनी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांसह मित्रमंडळींना पार्टी दिली. हा खास दिवस त्यांनी खास प्रकारे साजरा केला. पार्टीची सुंदर सजावट आणि लव्ह थिमने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.
आणखी वाचा – Video : आणखी एका रिअॅलिटी शोसह ‘झी मराठी’वर नव्या कोऱ्या दोन मालिका, प्रोमो प्रदर्शित
यावेळी सदाबहार कपलने रोमँटिक डान्सही केला. ते दोघं मजामस्ती करतानाही दिसले. केक कापून लग्नाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या खास व्हिडीओला रवींनी, ‘सर सुखाची श्रावणी..’ गाण्याची जोड दिली होती. शेअर करत रवींनी खास कॅप्शनही दिलं होतं.
रवी लिहितात, ‘२५ वर्षे साधी गोष्ट नाही, सहज तर नाहीच नाही. मग जलवा सेलिब्रेशन तर होणारच ना!’, असं कॅप्शन लिहीलं होतं. मोठ्या जल्लोषात त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजला केला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकारांनीही कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.