मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यांपैकी एक वाहिनी म्हणजे ‘झी मराठी’. कित्येक वर्षे या वाहिनीने विविध विषयांच्या संकल्पना मालिका रुपात मांडून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाहिनीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसतात. ‘लोकमान्य’, ‘यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’ यांसारख्या मालिकांनी प्रेक्षकांची रजा घेतली आहे. या पाठोपाठ आता ‘३६ गुणी जोडी’ व ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तर त्याजागी नवीन विषयांवर आधारित दुसऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या मालिकांचा प्रोमो ‘झी मराठी’ने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला.(Paru and shiva two new serial coming soon)
काही दिवसांपूर्वी अभिनेता हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत असलेला व हटके संकल्पनेचा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘झी मराठी’ आणखी एक रिअॅलिटी शो घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होत आहे. ‘ड्रामा ज्युनिअर’ असं या नव्या शोचं नाव असणार असून हा कार्यक्रम नवा कोणता ड्रामा निर्माण करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
आणखी वाचा – रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला झाले जुळ्या लेकींचे आई-बाबा?, ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
या कार्यक्रमांबरोबर ‘झी मराठी’वर आणखी नव्या दोन मालिका सुरु होणार आहे. या मालिकांचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओत फक्त मालिकेच्या नावांची ओळख करुन देण्यात आली आहे. मालिकेतील मुख्य पात्रांचं वर्णन एका ओळीत करतानाचा हा व्हिडीओ दिसत आहे. “मनसोक्त हसणारी ‘पारु’ आणि बिनधास्त जगणारा ‘शिवा’… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी… एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ लवकरच ‘झी मराठी’वर”, असं या प्रोमोच्या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे ‘झी मराठी’ आता नवीन मालिका, रिअॅलिटी शो घेऊन नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. हा प्रोमो येताच नव्या मालिकांबाबत प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणते कलाकार असणार, कशी पात्र पाहायला मिळणार, वेळ, वार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.