शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आणखी एका रिअ‍ॅलिटी शोसह ‘झी मराठी’वर नव्या कोऱ्या दोन मालिका, प्रोमो प्रदर्शित

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 17, 2023 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paru and shiva two new serial coming soon

Paru and shiva two new serial coming soon

मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यांपैकी एक वाहिनी म्हणजे ‘झी मराठी’. कित्येक वर्षे या वाहिनीने विविध विषयांच्या संकल्पना मालिका रुपात मांडून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाहिनीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसतात. ‘लोकमान्य’, ‘यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’ यांसारख्या मालिकांनी प्रेक्षकांची रजा घेतली आहे. या पाठोपाठ आता ‘३६ गुणी जोडी’ व ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तर त्याजागी नवीन विषयांवर आधारित दुसऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या मालिकांचा प्रोमो ‘झी मराठी’ने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला.(Paru and shiva two new serial coming soon)

काही दिवसांपूर्वी अभिनेता हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत असलेला व हटके संकल्पनेचा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘झी मराठी’ आणखी एक रिअ‍ॅलिटी शो घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होत आहे. ‘ड्रामा ज्युनिअर’ असं या नव्या शोचं नाव असणार असून हा कार्यक्रम नवा कोणता ड्रामा निर्माण करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला झाले जुळ्या लेकींचे आई-बाबा?, ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या कार्यक्रमांबरोबर ‘झी मराठी’वर आणखी नव्या दोन मालिका सुरु होणार आहे. या मालिकांचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओत फक्त मालिकेच्या नावांची ओळख करुन देण्यात आली आहे. मालिकेतील मुख्य पात्रांचं वर्णन एका ओळीत करतानाचा हा व्हिडीओ दिसत आहे. “मनसोक्त हसणारी ‘पारु’ आणि बिनधास्त जगणारा ‘शिवा’… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी… एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ लवकरच ‘झी मराठी’वर”, असं या प्रोमोच्या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा – Video : शाळेच्या स्नेहसंमेलनात आराध्या बच्चनचं दमदार सादरीकरण, लेकीचा व्हिडीओ आईनेच केला कॅमेरात कैद

त्यामुळे ‘झी मराठी’ आता नवीन मालिका, रिअ‍ॅलिटी शो घेऊन नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. हा प्रोमो येताच नव्या मालिकांबाबत प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणते कलाकार असणार, कशी पात्र पाहायला मिळणार, वेळ, वार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

Tags: coming soonParupromo launchshivatwo new serialzee marathi
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
sukanya mone emotional moment

Video : ‘बाईपण भारी देवा’च्या खास सेलिब्रेशनदरम्यान चाहत्यांचं प्रेम पाहून रडू लागल्या सुकन्या मोने, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.