महिलांवर आधारित यावर्षी बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील मराठीतील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत एका चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं तो म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’. या चित्रपटाला प्रेक्षकांचं बरंच प्रेम मिळालं. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित कथा असलेल्या या चित्रपटाला तर महिलावर्गाने अगदी डोक्यावर उचलून घेतलं होतं. चित्रपटातील प्रत्येकाच्या भूमिका सगळ्यांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या. या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाच्या निमित्ताने वर्षाखेरीज नुकतंच दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने भावुक झाल्या. (sukanya mone emotional moment)
महिल्यांच्या जीवनातील संघर्ष दाखविणाऱ्या या सहा बहिणींच्या कथेचा हा चित्रपट. चित्रपटाने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमकडून दमदार सेलिब्रेश करण्यात आलं. १६ डिसेंबरला मुंबईत या चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला होता. या शोला चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दिपा चौधरी उपस्थित राहून कार्यक्रमाला आणखीनच रंगत आणली. या खास शोला मिळालेला प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून गेले. वंदना गुप्ते तर एका क्षणाला भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. सध्या या सेलिब्रेशन दरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला झाले जुळ्या लेकींचे आई-बाबा?, ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत या सर्व अभिनेत्री फोटोंसाठी पोज देताना, हसताना दिसत आहेत. तर मध्येच वंदना भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या. महिलांचं प्रेम, चाहत्यांचा प्रतिसाद हे सगळं पाहून त्या भारावून गेल्या होत्या. त्यानंतर इतर सहकलाकारांनी त्यांना जवळ घेत हा सुंदर क्षण अनुभवताना दिसल्या.
आणखी वाचा – Video : आणखी एका रिअॅलिटी शोसह ‘झी मराठी’वर नव्या कोऱ्या दोन मालिका, प्रोमो प्रदर्शित
या सेलिब्रेशनला विविध मंडळींनी हजेरी लावली. सुकन्या यांच्या आईदेखील लेकीचं कौतुक पाहण्यासाठी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडूनही सुकन्या यांचं व त्यांच्या आईचं बरंच कौतुक होत आहे.