सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शाळेच्या स्नेहसंमेलनात आराध्या बच्चनचं दमदार सादरीकरण, लेकीचा व्हिडीओ आईनेच केला कॅमेरात कैद

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 16, 2023 | 5:37 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
aaradhya bachchan shows her acting skills

aaradhya bachchan shows her acting skills

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या चांगलंच उधाळ आलं आहे. अभिनेत्रीने बच्चन परिवाराचं घर सोडलं असून ती तिच्या आईकडे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे. या दरम्यान तिच्या लेकीच्या म्हणजेच आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात या कार्यक्रमात अभिनेता अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन व अभितेत्री ऐश्वर्या रॉय एकत्र दिसले. या कार्यक्रमात आराध्याच्या सुंदर अभिनयाची झलक सगळ्यांना पाहायला मिळाली. (aaradhya bachchan shows her acting skills)

या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे विविध व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील एक व्हिडीओ ऐश्वर्याच्या लेकीचा म्हणजे आराध्याच्या व्यासपीठावरील अभिनयाचा आहे. त्यात ती स्टेजवर दिसत आहे. त्यात तिने नाटकाशी जुळता मेकअप केला आहे. तिच्या डायलॉगचं डायमिंग, अभिनय हे सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहता सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आराध्या एक उत्तम अभिनेत्री असल्याचंही बोललं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Majjacha Adda : “बरेच कलाकार…”, अशोक सराफ नेहमी साध्या पेहरावात का दिसतात?, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “मी कधी सुट-बूट…”

नेटकऱ्यांनी आराध्याची तुलना शाहरुखच्या मुलीशी म्हणजे सुहानाशी व श्रीदेवीच्या मुलीशी म्हणजे खुशी कपूरशी केली आहे. ज्यांनी नुकतंच ‘द आर्चीज’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोघांपेक्षा आराध्या खूप चांगली अभिनेत्री असल्याचं बोललं जात आहे. चाहत्यांना आराध्याची डायलॉग डिलिव्हरी खूप आवडली. चाहत्यांनी कमेंट करत ऐश्वर्याच्या लेकीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘आराध्याच्या हावभावांपासून ते तिच्या डायलॉगबाजीपर्यंत तिने हे सिद्ध केलं की ती बच्चन कुटुंबियांची व ऐश्वर्या—अभिषेकची मुलगी आहे’. नाटकातील तिने साकारलेल्या पात्राने चाहत्यांना ‘मॅलेफिशिएंट’मधील ऐश्वर्याचा आवाजाची आठवण करु दिली.

View this post on Instagram

A post shared by AISHWARYA RAI HUB (@aishwarya_rai_hub)

आणखी वाचा – Majjacha Adda : “चित्रपटाची स्क्रिप्ट, डायलॉग काहीही लिहितात अन्…”, मराठी चित्रपटांबाबत अशोक सराफांचं स्पष्ट मत, काम न करण्यावरुन म्हणाले, “काहीतरी वाईट करुन…”

काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. त्यातील एक कमेंट म्हणजे शेवटी आराध्याचं कपाळ दिसलं. या कार्यक्रमातील पात्रासाठी आराध्याने तिचे सर्व केस मागे बांधले होते. त्यामुळे यावेळी तिची वेगळी हेअर स्टाईल पाहायला मिळाली. याअगोदर आराध्याचा नेहमीचा हेअर कट सगळ्यांना पाहिला होता. त्यामुळे आता तिचं कपाळ दिसलं असल्याच्या कमेंट सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.  

Tags: acting skillsAISHWARYA RAIBollywood aaradhya bachchan
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
aishwarya and avinash narkar dance video on animal movie bobby deol entry jamal jamaloo kudu song

Video : 'अ‍ॅनिमल'मधील गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, भलतेच भाव खाऊन गेले अविनाश, चाहते म्हणाले, "साहेब तुम्ही..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.