शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्…; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, “पहिलाच चित्रपट तरीही…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2023 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
london misal fame actress ritika shrotri appreciated to rutuja bagwe for her descion in interview)

ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्...; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, "पहिलाच चित्रपट तरीही..."

‘लंडन मिसळ’ हा मराठमोळा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या हटके कथेमुळे चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चा होती. या चित्रपटातून भरत जाधव एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तर ऋतुजा बागवे, गौरव मोरे, रितीका क्षोत्री, माधुरी पवार, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कालपासून (८ डिसेंबर) हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कलाकार सर्वत्र भेटी देत आहेत. अशातच अभिनेत्री रितीका व ऋतुजा प्रमोशनसाठी रेड एफ.एम.च्या आर.जे.ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रितिकाने सहअभिनेत्री ऋतुजाचे कौतुक केले आहे. (Rutuja Bagwe On Instagram)

यावेळी आर.जे.कडून रितीकाला “बहीण म्हणून ऋतुजाची वैयक्तिक व चित्रपटातील तिच्या पात्राची एक चांगली सवय कोणती?” असा प्रश्न विचारण्यात येतो. यावर “हा खूप चांगला प्रश्न आहे” म्हणत ती असे उत्तर देते की, “लंडन मिसळ चित्रपटाच्या एडिटनंतर चित्रपट खूप मोठा झाला होता. त्यामुळे दिग्दर्शकाने आम्हाला चित्रपट बघायला बोलावलं होतं. तेव्हा आम्हालासुद्धा चित्रपट खूप मोठा वाटला. त्यामुळे आम्ही दिग्दर्शकांना चित्रपटातले काही सीन्स एडिट करायला सांगितले. यावर  दिग्दर्शकांनी ऋतुजाला फोन करुन एडिटबद्दल सांगितले. तेव्हा ऋतुजाने दिग्दर्शकांना माझ्या काही सीन्सचे या चित्रपटात फारसे योगदान नाही. त्यामुळे माझे काही सीन्स काढून टाकलेत तरी चालेल. पण तुम्ही रितीकाचे सीन न काढता ते तसेच ठेवायला सांगितले. यामुळे ही खरच माझी मोठी बहीण असल्यासारखे मला वाटले.”

View this post on Instagram

A post shared by Rj Akki – Red Fm (@rjakkiiredfm)

आणखी वाचा – “अशी चेष्ठा करताना…”, नवीन घर घेताच मयुरी वाघला पूर्वाश्रमीच्या पतीवरुन डिवचणाऱ्यांवर मंजिरी ओक भडकली, म्हणाली, “आनंदावर विरजण…”

यापुढे ती असं म्हणाली की, “ऋतुजाचा हा नि:स्वार्थीपणा मला खुपच आवडला. तिचा हा निर्णय माझ्यासाठी चांगला होताच, पण चित्रपटाच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा निर्णय होता. तिने याआधी अनेक सुंदर कामे केली आहेत. अनेक चित्रपट व मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण नायिका म्हणून तिचा हा पहिला चित्रपट असूनदेखील तिने घेतलेला हा निर्णय खरंच खूप मोठी गोष्ट आहे.” यापुढे रितीकाने चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दलची एक चांगली गोष्ट सांगताना असे म्हटले की, “जेव्हा आम्ही दोघी एखादा भावनिक सीन शूट करायचो तेव्हा ती एका दमात तो सीन करायची आणि त्यानंतर मला काही गोष्टी सुचवायची. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाच विनोदी भूमिका करत असल्यामुळे ती चांगलं काम करण्यासाठी कायमच तत्पर असायची. त्यामुळे कामाबद्दल असलेली आवड, निष्ठा व समर्पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत”

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने केलं दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली, “हा निर्णय घ्यायला हिम्मत आणि…”

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळट आहे. या चित्रपटात लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची कथा बघायला मिळणार आहे आणि या दोन बहिणींच्या भूमिकेत ऋतुजा व रितीका आहेत. भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायले आहे. तसेच ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित असल्याचेही म्हणण्यात येत आहे. या चित्रपटाची कथा जालिंदर कुंभार यांनी लिहिली आहे, तर पटकथा व संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै व आरोन बसनेट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे,             

Tags: entertainment newslondon misalmarathi actressmarathi entertainmentmarathi movieMarathi newsritika kshotrirutuja bagwe
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
rajinikanth house affected by Chennai floods

Video : रजनीकांत यांच्या चेन्नईमधील बंगल्याला पुराच्या पाण्याचा वेढा, चक्रीवादळामुळे पाणी घरापर्यंत आलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.