‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. छोट्या पडद्यावरील त्याच्या भूमिकांमधून त्याने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यानंतर आता लवकरच हार्दिक छोटा पडदा गाजवायला ‘जाऊबाई गावात’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हार्दिक अभिनयाबरोबरचं सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच काही दिवसांपूर्वी हार्दिकने शेअर केलेल्या भावुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (Hardeek Joshi Emotional Post)
काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हार्दिक जोशीच्या मोठ्या भावाच्या पत्नीचं निधन झालं. हार्दिक जोशीच्या वहिनीचं आकस्मिक निधन झालं असल्याचं त्याने या पोस्टद्वारे सांगितलं होतं. याबाबतची एक भावुक पोस्ट हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. त्याच्या या पोस्टवरून तो बराच खचलेला दिसला. हार्दिक व त्याच्या वहिनीचं अगदी जवळच नातं होतं.
यानंतर आता पुन्हा एकदा हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हार्दिकने त्याच्या वहिनीच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने वहिणीबरोबर परदेशात फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकची वहिनी, भाऊ, पुतणी व अक्षयाही दिसत आहे. सहकुटुंब त्यांनी धमाल मस्ती करतानाचा हा व्हिडीओ हार्दिकने शेअर करत, “तुझं स्थान कायम आमच्या मनात घर करून राहील. तसेच मी तुला खूप मिस करतोय. मी तुला कधीच विसरू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी” असं त्याने कॅप्शन देत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिकने त्याच्या वहिनीसाठी खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने, “मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवत तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल” अशी भावुक करणारी पोस्ट वाहिनीचं निधन झाल्यानंतर केली होती.