शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओरीनेच सांगून टाकलं ‘बिग बॉस १७’चा विजेता कोण होणार?, खुलासा करत म्हणाला, “त्याच्यामध्ये काहीतरी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 29, 2023 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Orry said the winner name of bigg boss 17

Orry said the winner name of bigg boss 17

‘बिग बॉस १७’च्या पर्वात सुरुवातीपासूनच चांगलीच रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच बरीच भांडणं, वादविवाद, मारामारी होत असल्यामुळे कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. अशातच मागच्या आठवड्यात ओरी उर्फ ओराहन अवत्रामणीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेश चांगलाच चर्चेचा विषय ठरला. पण त्याने एका दिवसातच घरातून काढता पाय घेतला. त्याच्या अचानक येण्याने तो घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला असल्याचं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं. मात्र तो घरातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी खास पाहुणा म्हणून आला होता. ओरी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याला ‘बिग बॉस १७’ कोण जिंकणार? असं विचारण्यात आलं.  तेव्हा त्याने चिंटू हे नाव घेतलं. (Orry said the winner name of bigg boss 17)

शोमधून बाहेर आल्यानंतर ओरीने पिंकविलाला एक मुलाखत दिली. तेव्हा त्याने ‘बिग बॉस’च्या घरातील हालहवाल सांगितला त्याचबरोबर त्याने हा शो कोण जिंकणार याबद्दलही वक्तव्य केलं. ओरी म्हणाला, “जेव्हा ईशाने अभिषेकला सोडून चिंटूला म्हणजेच समर्थ जरेलला निवडलं तर नक्कीच त्याच्यात काहीतरी खास आहे. ज्याप्रकारे समर्थ चालतो, वागतो त्याला पाहून मला खूप छान वाटतं. मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही हे सगळं नक्कीच आवडत असेल”.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

आणखी वाचा – ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर रणबीर कपूरला अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक?, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “मला आता केवळ…”

ओरी पुढे सांगतो, “मी स्वतः जर प्रेक्षक असतो तर चिंटूला बघायला मला आवडलं असतं. त्याचे डिंपल्स, त्याचे डोळे, त्याचा मजेशीर अंदाजात यासगळ्या गोष्टी मला बघायला नक्कीच आवडल्या असत्या. माझ्या माहितीनुसार, चित्रपट, टीव्ही शोचे केवळ तीन उद्दिष्ट असतात. मनोरंजन, मनोरंजन, मनोरंजन. या तिन्हीही गोष्टी चिंटूकडे आहेत”.

आणखी वाचा – Kantara 2 Teaser : हातात भाला, रुद्रावतार अन्…; ‘कांतारा २’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

‘विकेंड वार’च्या आठवड्यात ओरीने सलमान खानबरोबर बऱ्याच मजेशीर गप्पा मारल्या. ओरीने हे ही सांगितलं की त्याला पहिल्यांदा असं वाटलं होतं की सलमान खान बिग बॉस आहे म्हणजे जेव्हा त्याला बिग बॉसच्या घरी यायचा कॉल आला तेव्हा त्याला वाटलं की सलमान खानच्या घरी बोलवण्यात आलं. पण त्याला या शोमध्ये बोलावलं गेलं आहे हे नंतर कळलं.

Tags: bigg boss 17orrysamarth jurel
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sameeha Sabnis Filmfare

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते उदय सबनीसांची लेकही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच पटकावला फिल्मफेअर पुरस्कार, सर्वत्र होत आहे कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.