सध्या सर्वत्र फिल्मफेअर अवॉर्डची चर्चा सुरु आहे. फिल्मफेअर अवॉर्डसाठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसत आहेत. अनेकांना फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अशातच मराठमोळ्या अभिनेत्रीने फिल्मफेअरच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका व निर्माती अशी तिहेरी भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री समिहा सबनीस हिने फिल्फेअरची ट्रॉफी जिंकली आहे. (Sameeha Sabnis Filmfare)
ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांची कन्या समिहा सबनीस हिने हा सन्मान पटकावला आहे. उदय सबनीस यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची लेकही सिनेसृष्टीत स्वतःच नाव मोठं करत आहे. उदय सबनीस यांना लेकीचा अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घडली आहे. त्यांच्या लेकीला म्हणजेच समिहाला सोल कढी या लघुपटासाठी फिल्फेअर अवॉर्ड मिळाला आहे.
सोल कढी हा लघुपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोलकढी हा लघुपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला असून या लघुपटात अभिनेत्री शुभांगी गोखले, समिहा सबनीस व अभिनेता निरंजन कुलकर्णी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. या लघुपटासाठी समिहाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला असल्याची खुशखबर तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसह शेअर केली आहे.
फिल्मफेअर अवॉर्ड घेतलेले फोटो शेअर करत समिहाने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समिहाने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “एक चित्रपट-दिग्दर्शक म्हणून माझ्या मनात जी काही शंका होती, ती फिल्मफेअरच्या रात्रीच्या वादळी वाऱ्याबरोबर उडून गेली”. पॉप्युलर चॉइस अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट लघुपट, २०२३ जिंकल्याबद्दल सोल कढीच्या संपूर्ण टीमचे तिने आभार मानले आहेत.