‘बिग बॉस १७’ हा शो सुरुवातीपासूनच मनोरंजक असल्याचे पाहायला मिळाले. घरातील वादविवाद, भांडणतंटे, मारामारी यामुळे या शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अभिनेती अंकिता लोखंडे ही बरीच चर्चेत आहे. कधी पती विकी जैनबरोबरच्या वादामुळे तर कधी तिच्या गरोदरपण्याच्या बातमीमुळे ती चर्चेत आली. अशातच एका व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Bigg Boss 17 : Ankita Lokhande Cried With Mannara Chopra’s Fight )
या व्हिडीओमध्ये अंकिता व मन्नारा यांच्यात काहीतरी कारणावरून भांडण होत असल्याचे दिसत आहे. यात अंकिता मन्नाराला “तु लोकांच्या बोलण्यावर बोलण्यावर जाऊ नकोस” असे म्हणत मन्नाराला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यावर मन्नारा म्हणते, “तुझ्या बोलन्याची पद्धत बघ. मी तुझी मैत्रीण नाही. त्यामुळे तु माझ्याशी बोलू नकोस.” यानंतर अंकिता पुन्हा तिला असं म्हणते की, “आता काही बोलू नकोस.” यानंतर मन्नारा तिच्यावर ओरडून असे म्हणते की, “नाही. तु माझे ऐकून घे. तु माझ्या कमजोर बांजूवर चर्चा करत घरातल्यांबरोबर चर्चा केलीस आणि वाद निर्माण केलास. त्यामुळे आता तुझा माझ्याशी काहीही संबंध नाही.”
आणखी वाचा – Video : अखेर तो आलाच! ‘बिग बॉस’च्या घरात ओरीची दमदार एण्ट्री, सलमानबरोबरचा व्हिडीओ आला समोर
यावर “इथे कुणीही उठून काहीही बोलतं” असं म्हणत अंकिताला अश्रु अनावर होतात आणि ती ढसाढसा रडायला लागते. यावर विकी तिला जवळ घेत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्यांच्यात हा वाद नेमका कशावरून झाला? हे येत्या भागात पाहायला मिळेल. दरम्यान या व्हिडीओखाली अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या बाजूने प्रतिक्रिया करत तिला खंबीर राहायला सांगितले आहे. तर मन्नाराच्या वतीने अनेक नकारात्मक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, आगामी भागात अंकिता-मन्नारा यांच्यातील भांडणाचे नेमके कारण काय? हे समोर येईलच. पण ‘बिग बॉस’च्या घरात आणखी काही नवीन स्पर्धक येणार आहेत. याचीदेखील चाहते वाट बघत आहेत. त्यामुळे येणाऱ्या भागात नक्की कोणत्या कलाकारांची एण्ट्री होणार? आणि या शोमध्ये आणखी नवीन काय ट्विस्ट येणार? यासाठी चाहते उत्सुक आहेत.