Rajkumar Kohli Passes Away : ‘जानी दुश्मन’, ‘नागिन’, ‘पत्नी और तवैफ’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १९६३ पासून कोहली सिनेसृष्टीत कार्यरत होते. प्रेम चोप्रा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सपनी’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती त्यांनी केली होती.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अरमान कोहलीचे वडील राजकुमार कोहली यांचे आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास निधन झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, राजकुमार कोहली आज सकाळी आंघोळीसाठी गेले होते आणि काही वेळ ते बाथरूममधून बाहेर आलेच नाहीत. त्यावेळी त्यांचा मुलगा अरमान याने दरवाजा तोडला तेव्हा त्याचे वडील जमिनीवर कोसळलेले दिसले. त्यानंतर त्यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयात राजकुमार यांना मृत घोषित करण्यात आले. आज संध्याकाळी राजकुमार कोहली यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Veteran film director Raj Kumar Kohli passed away in Mumbai today. He was 93 years old.
— ANI (@ANI) November 24, 2023
राजकुमार कोहली यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकुमार कोहली यांचा जन्म १९३० साली झाला आहे. १९६० साली राजकुमार यांनी सिनेसृष्टीत सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु केला. १९६३ साली त्यांनी ‘सपनी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. यानंतर त्यांच्या ‘लुटेरा’, ‘कहाणी हम सब की’ सारख्या चित्रपटांना बऱ्यापैकी सफलता मिळाली.
अरमान कोहली हा राजकुमार कोहली यांचा मुलगा आहे. राजकुमार यांनी इतर कलाकारांसह त्यांच्या मुलालाही चित्रपटात काम करण्याची संधी दिली. बाल कलाकार म्हणून अरमानने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवास सुरु केला. अरमानने वडिलांच्या ‘बदले की आग’ व ‘राज तिलक’ या चित्रपटात काम केलं. अरमानला ‘बिग बॉस’मुळे विशेष लोकप्रियता मिळाली.