बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीरचा हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. गुरूवारी दिल्लीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा करण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेत्री रश्मिका मंदन्ना व रणबीर कपूरसह बॉबी देओल, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. यावेळी रणबीरला त्याच्या चित्रपटातील भूमिकेबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने या भूमिकेचा संदर्भ त्याच्या वडिलांशी जोडत त्याने या भूमिकेबाबत खुलासा केला. (ranbir kapoor tells animal avatar inspired by father)
ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात रणबीर कपूर फुल ब्लॅक कपड्यात पाहायला मिळाला. तर रश्मिकाने शिफॉन प्रिंटेड साडी नेसली होती. या कार्यक्रमात त्याला चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा तो म्हणाला, “’ॲनिमल’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनाही हाच प्रश्न विचारला होता. मला या भूमिकेसाठी एखादं उदाहरण द्या. तेव्हा मला अचानक माझ्या बाबांची आठवण आली. माझे बाबा हे खूप आक्रमक तसेच तापट स्वभावाचे होते. त्यामुळे ही भूमिका मी त्यांना डोळ्यासमोर ठेवून केली”.
रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता तेव्हा त्याचं पूर्ण खापर ऋषि कपूर यांनी अनुराग बसु याच्यावर फोडलं होतं. त्यावेळी त्यांनी अनुराग बसूला बेजबाबदार असंही म्हटलं होतं. इतकंच नाही तर ऋषी यांनी एका मुलखतीत म्हणाले होते, “अनुराग बसूने गज्जा जासूस, जग्गा जासूस बनवला. हा चित्रपट माझ्या उच्चारणा प्रमाणेच खूप खराब आहे. मला वाटतं ते या चित्रपटात खूप जास्तच बुडून गेले होते”.तेव्हाच रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात बघून कधीच बोलत नाही. नजर खाली करून मी त्याच्याबरोबर संवाद साधतो आणि फक्त हो म्हणतो. बऱ्याच वेळा त्यांना समजवणं खूप कठीण होतं. अशावेळी मी माझ्या आईला सांगून माझा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. मी त्यांना नियंत्रित नाही करु शकता”, असं सांगत त्याने एका मुलाखतीत त्याच्या बाबांचा म्हणजेच ऋषी कपूर यांचा कसा दरारा होता हे त्याच्या वक्तव्यातून समजून येत आहे.
रणबीर कपूर व रश्मिका मंदान्नासह या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओलही दिसणार आहेत. अनिल कपूर या चित्रपटात रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओल चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा वडील व मुलाच्या नात्यावर आधारीत आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.