Bigg Boss 17 : सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कुणीही एका रात्रीत प्रसिद्ध होतं. कोणत्याही नवख्या व्यक्तीला एका रात्रीत ओळख, प्रसिद्धी व लोकप्रियता मिळते. अशातलाच एक जण म्हणजे ‘ओरी’ उर्फ ओरहान अवतारमणी. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांचे दिवाळी पार्टीतले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्या पार्टीमध्ये अनेक स्टारकिड्स व सेलिब्रिटींबरोबर हा ओरी दिसला होता. सध्या तो बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला तरी अनेक मोठ्या कलाकारांपासून ते उद्योगपतींपर्यंत त्याची प्रत्येकाशी ओळख असल्याचे दिसून येते. ओरी हा स्वत:ला गायक, साँग रायटर, क्रिएटिव्ह डारेक्टर, फॅशन स्टायलिस्ट असल्याचं सांगतो. (Bigg Boss 17 New Promo Orry’s Entry)
गेल्या काही दिवसांपासून तो ‘बिग बॉस १७’ मध्ये येणार असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. त्याच्या ‘बिग बॉस’च्या एण्ट्रीबद्दल स्पष्टता नव्हती. अशातच मुंबईत एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान ओरी रेड कार्पेटवर पोज देत असताना त्याला पापाराझींकडून ‘बिग बॉस’मधील प्रवेशाबाबत विचारण्यात आले होते. यावर त्याने गंमतीने “कोणता बॉस…?” असं उत्तर दिले होते. त्यामुळे त्याच्या ‘बिग बॉस’मधील प्रवेशाबद्दल साशंकता होती. मात्र आता या सगळ्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी ओरी हा ‘बिग बॉस’मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे.
Promo BiggBoss17 WKW, Vicky aur Sana ki khuli pol, Munawar aur Vicky pe bhadke salman aur Orry entry pic.twitter.com/jF493iNYFW
— The Khabri (@TheKhabriTweets) November 23, 2023
नुकताच सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात ओरीने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत ओरीने आणलेल्या सामानावरून सलमान खान त्याची मजा घेताना दिसत आहे. यावेळी ओरीने त्याच्याबरोबर आणलेल्या बॅग्स (समान) पाहून सलमान खान त्याला गंमतीत असे म्हणतो की, “आम्ही घरात सदस्यांना सन्मानाने पाठवतो, सामानाने नाही”. यावर ओरी, सलमानसह घरातील इतर सदस्यही हसतात.
गेल्या काही दिवसांत ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंत, आदिल खान, पूनम पांड्ये त्याचबरोबर ओरीच्या वाईल्ड कार्ड एण्ट्रीवरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र ओरीच्या प्रवेशाच्या अफवा खऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान, ओरीच्या प्रवेशामुळे प्रेक्षकांना आगामी भागात ट्रीट मिळणार यात काही शंका नाही. पण ओरीनंतर आता घरात आणखी कोण-कोण नवीन सदस्य प्रवेश करणार? याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर येत्या ‘विकेण्ड का वार’ मध्ये सलमान ओरीच्या स्वागताबरोबरच कुणाकुणाची शाळा घेणार? यासाठीही चाहते खुपच उत्सुक आहेत.