शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रांती रेडकरने पतीसह केलेल्या अनोख्या उपक्रमाने वेधलं लक्ष, अनाथ मुलींबरोबर यंदाची भाऊबीज केली साजरी, म्हणाले, “ज्या मुलींना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news

अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी सोशल मीडियाद्वारे मजेशीर अंदाजात चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या जुळ्या मुलींचे व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असते. तसेच पती समीर वानखेडेंचे व त्यांच्या कामाबद्दल माहिती देणारे फोटो-व्हिडिओदेखील ती शेअर करत असते. नुकतंच दिवाळीनिमित्त ती तिच्या सासरी वाशीमला गेल्याचा एक छान व्हिडीओदेखील तिने चाहत्यांबरोबर शेअर केला होता. (Actress Kranti Redkar Shared Video On Instagram)

अशातच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. क्रांती व समीर यांनी त्यांची यंदाची भाऊबीज अकोला मधील श्री संत गजानन महाराज पादुका संस्थानच्या अनाथ मुलींबरोबर साजरी केली. त्याचेच काही खास क्षण क्रांतीने या व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. त्याचबरोबर समीर यांनीदेखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – रजनीकांत यांच्या नातवाला सुपरबाईक चालवणं पडलं महाग, नियमांचं उल्लंघन केल्याने चेन्नई पोलिसांनी ठोठावला दंड

हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “श्री गजानन महाराज पादुका संस्थानच्या मुलींबरोबर यंदाची भाऊबीज साजरी करणे हा खूप भावनिक अनुभव होता. ज्या मुलींना कोणी नाही त्यांचा भाऊ बनणे आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासाठी कायम उभं राहण्याची ही एक जबाबदारीदेखील आहे.” त्याचबरोबर समीर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. “श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव, अकोला संचालित अनाथाश्रमात भाऊबीज साजरी करण्याचे भाग्य लाभले. या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी हे कमीच आहे” असं म्हणत त्यांनी हे खास क्षण शेअर केले आहेत.

आणखी वाचा – ‘भाग्य दिले….’ फेम जान्हवी किल्लेकरने नवी दुचाकी घेताच नेटकऱ्यांनी केलेली कमेंट लक्षवेधी, म्हणाले, “पेट्रोल परवडत…”

दरम्यान, क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर समीर-क्रांतीच्या या अनोख्या व समाजभान जपणाऱ्या अनोख्या कृतीमुळे नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: entertainment newskranti redkarmarathi actressmarathi entertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage

"सत्यनारायणाची पूजा, औक्षण, पाहुणचार अन्…", अमृता देशमुखच्या माहेरी नव्या जोडप्याचं असं झालं स्वागत, लग्नानंतरचे फोटो आले समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.